Hot Posts

6/recent/ticker-posts

वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मतदानाबाबत जनजागृती...



गोंदिया  दि. 18: 

    निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावण्याबाबत तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने आज दिनांक 18 ऑक्टोंबर 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.

स्वीपच्या माध्यमातून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा पिढी देशाचे भविष्य असून युवांना मतदानाच्या प्रक्रिया विषयी माहिती व्हावी तसेच इतर मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी हा जनजागृती कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी तथा तालुका नोडल अधिकारी प्रदीप समरीत, शिखा पिपलेवार, डॉ.महेंद्र गजभिये, मोरेश्वर बडवाईक, रमेश चव्हाण, नितीन मालाधारी, हर्ष पवार, अनुप नागपुरे, केदार गोटेफोडे, सचिन धोपेकर, चंदू दमाहे, चंदू दुर्गे, संजय टेंभरे, विजय लिल्हारे, सूनैना पानतावणे आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या