Hot Posts

6/recent/ticker-posts

निवडणुकीतील काळ्या पैशाबाबत नागरीक करू शकतील थेट आयकर विभागाकडे तक्रार...



टोल-फ्री क्रमांक, व्हॉट्सअॅप किंवा मेल आयडीवर साधा संपर्क...

गोंदिया  दि. 18 :

     महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची नुकतीच घोषणा झाली आहे. त्यानुसार येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या असून पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पडाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचे आयकर विभागही तयार असून दरम्यानच्या कालावधीत काळ्या पैशांच्या व्यवहारावर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती नागपूर येथील उप आयकर संचालक (अन्वेषण) अनिल खडसे यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान काळ्या पैशांचे व्यवहार रोखण्यासाठी नागरिकांनी आयकर विभागासोबत यावे. निवडणुकीत वापरला जाणारा काळा पैसा, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल, आदी संशयास्पद गोष्टी आपल्या नजरेस पडल्यास नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता थेट आयकर विभागाशी संपर्क साधावा. संबंधित माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख ही गुप्त ठेवण्यात येईल, असे श्री. खडसे यांनी सांगितले.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी आयकर विभागाला सदर माहिती देण्यासाठी 1800-233-0356 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. एखाद्या घटनेची छायाचित्रे, व्हिडिओ इ. माहिती पाठवण्यासाठी 9403390980 हा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय, सदर मजकूर nagpur.addldit.inv@incometax.gov.in किंवा nashik.addldit.inv@incometax.gov.in या मेल आयडीवर मेलही करता येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या