Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा संपन्न


 लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये - अध्यक्ष तथा खासदार डॉ. प्रशांत पडोळे...

गोंदिया, दि.9 : 

       जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची सभा आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2024 रोजी समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे पार पडली. सभेमध्ये अध्यक्ष तथा खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सर्व विभाग प्रमुखांकडून योजनेची संपुर्ण माहिती जाणून घेतली व पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये असे निर्देश सर्व विभागांना यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रंहागडाले, माजी आमदार दिलीप बनसोड, जिल्हा परिषदेचे सदस्य तथा सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

सभेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना (सर्वांसाठी घरे-शहरी), प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण, राष्ट्रीयग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियान, राष्ट्रीय वारसा शहर विकास आणि संवर्धन योजना, अटल मिशन फॉर रिजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, स्मार्ट सिटी अभियान, उज्ज्वल डिस्कॉम हमी योजना,  प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, मध्यान्ह भोजन योजना, प्रधान मंत्री उज्ज्वला योजना, जल मार्ग विकास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या विषयांवर सादरीकरणाद्वारे योजनेची माहिती सादर करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या