Hot Posts

6/recent/ticker-posts

अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा भाजपचा मार्ग मोकळा ; निलबंन मागे...


गोंदिया,दि.०7 ;

   गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार व चाबी संंघटनेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांचे भारतीय जनता पक्षाने २०१९ मध्ये केलेले निलंबन आज(दि.०६)घेतल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याने अग्रवाल यांचा भाजपमध्ये पुन्ह प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. अग्रवाल यांच्यासोबत त्यांच्या १२ सहकारी पदाधिकारी यांचेही भाजपने निलबंन मागे घेतले आहे.

विनोद अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाने भाजपकडून ते विधानसभेच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट झाल्याने भाजपमधील बहुजन ओबीसी नेत्यांमध्ये चांगलीच नाराजी दिसून येत आहे.विनोद अग्रवाल हे लवकरच आपल्या चाबी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये मोठ्या कार्यक्रमात प्रवेश करणार आहेत.त्याकरीता त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कार्यक्रमस्थळी आणण्याकरीता तब्बल ९०० गाड्यांची बुकींग केल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विनोद अग्रवाल यांच्यासोबत १२ सदस्यांचे निलबंन मागे घेतले आहे.त्यामध्ये भाऊराव उके, छत्रपाल तुरकर,मुनेश रहागंडाले,शिव शर्मा,घनश्याम पानतवणे, अमित बुध्दे,रामराजे रवरे,धर्मेश अग्रवाल,दिपक बोबडे,नीतू बिरिया,शैलेष सोनवणे,कमलेश लिल्हारे यांचा समावेश आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आलेले गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी दिल्याने विनोद अग्रवाल यांनी नाराज होत कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव अपक्ष निवडणूक लढवत ती जिंकली.गोंदिया विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच अपक्ष आमदार या निवडणुकीत विजयी झालेला होता.त्यानंतर महायुतीचे सरकार येताच त्यांनी भाजपशी जुळवून घेतले.तसेच लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता.त्यातच माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप आपल्याला उमेदवारी देणार नाही हे कळल्यावर त्यांनी घरवापसीचा निर्णय घेतला.त्यांच्या घरवापसीच्या निर्णयानंतर विनोद अग्रवाल यांचे भाजप परतीचे दार पुर्णपणे उघडले होते.त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी निलंबन मागे घेतल्याने आता शिक्कामोर्तब झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या