Hot Posts

6/recent/ticker-posts

देवरी शहरातील नगरपंचायत गार्डन येथे डुकरांचा हैदोस ; नागरीकात भितीचे वातावरन

 


देवरी,दि.01 ; 

       शहर स्वच्छ स्पर्धेत देवरी नगरपंचायत नेहमीच भाग घेत असते, अनेकदा पुरस्कारही मिळाले. मात्र देवरी शहरातील प्रभाग क्रमांक 12 येथील करोडो रुपये खर्च करुन तयार करन्यात आलेल्या   गार्डन मध्ये  डुकरांचा हैदोस होत असतानाही त्याकडे देवरी नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

१७ सदस्य असलेल्या नगरपंचायत पदाधीकारी  यांच्या पुढाकारातून देवरी शहर स्वच्छ स्पर्धेत देवरी नगरपंचायत दरवर्षी हिरीरीने भाग घेत आहे. यासाठी मागील काळात देवरी नगपंचायतला लाभलेेले मुख्याधिकारी  यांनी प्रयत्न करून पुरस्कारही पटकाविला. मात्र आज स्थितीत देवरी शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्यात देवरी नगरपंचायत  पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. यामुळे  नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तत्काल देवरी नगरपंचायतला प्रभारी  मुख्याधिकारी आहेत. त्यामुळे देवरी नगरपंचायतचा वाली कोन हा प्रश्न कायम आहे. 

शहरातील मुख्य रसत्यावर  मोकाट जनावरे, कुत्रे यांची भर रसत्यावर रात्रीदरम्यान मैफील पहायला मिळते. सध्या देवरी शहरातील प्रभाग क्रमांक 12 येथील गार्डन मध्ये सकाळी व सायंकाळी फिरायला जानार्या नागरिकांना डुंकरांमुळे नाहक त्रास होत असतानाही देवरी नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्याप्रती तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या