Hot Posts

6/recent/ticker-posts

गोंदिया जिल्हा औषधि विक्रेता संघाचे उत्पल शर्मा सलग चौथ्यांदा बिनविरोध अध्यक्ष.


गोंदिया, दि.01 ; 

      गोंदिया जिल्हा औषधी विक्रेता संघाच्या पुढील तीन वर्षांच्या कार्यकारिणी साठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली.  ज्यामध्ये उत्पल नीलकमल शर्मा यांची सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. उत्पल शर्मा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर कार्यकारिणीने राजेश अग्रवाल यांची उपाध्यक्ष पदी, रुपेश रहांगडाले यांची सचिव, प्रकाश वंजारी सहसचिव, सुनील गंगवानी कोषाध्यक्ष, अमोल मेश्राम संघटन सचिव आणि सुसनजित शहा यांची टीआरसी कन्वेणर  म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 देशातील औषध व्यवसाय क्षेत्रातील प्रतिष्ठित संघटना असलेल्या ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या गोंदिया जिल्हा संघटनेत जिल्ह्यात घाऊक व किरकोळ औषध विक्रेत्यांसह एकूण 558 मतदार आहेत. मात्र परस्पर समन्वयातून बिनविरोध निवडणुका घेण्याचा या संघटनेचा नेहमीच प्रयत्न असतो. तो यावेळीही यशस्वी झाला.  यावेळीही उत्पल शर्मा यांचा आतापर्यंतचा यशस्वी कार्यकाळ आणि त्यांच्या नेतृत्व क्षमतेमुळे त्यांच्या नावाची सुरुवाती पासूनच चर्चा राहिली.  

ही निवडणूक प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू होऊन 29 सप्टेंबर पूर्ण झाली. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एमएससीडीएचे प्रतिनिधी मदन पाटील आणि निवडणूक अधिकारी म्हणून रामसिंग भारद्वाज आणि आशिष अग्रवाल यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.  नामनिर्देशन झाल्यानंतर विरोधात कोणाचेही नाव न आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. नवीन कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांचे जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या