Hot Posts

6/recent/ticker-posts

हरियाणाच्या बजरंगी ची येन्ट्री ; देवनगरीत होणार ५१ फुटी रावणाचे दहन

 



देवरी नगरपंचायत मैदान गर्दीने फुलनार ; दसरा उत्सव समीती सूपर २४ चे भव्य आयोजन...

देवरी, दि. 02 ; (मुकेश खरोले..🖋️)

      गोंदिया जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा दसरा महोत्सव असलेल्या दसरा उत्सव समीती सूपर २४ तर्फे या वर्षी देवरीच्या रावण दहन  महोत्सवात (दि.१३) रात्री ९.३० वाजता ५१ फुट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन होणार आहे. यानिमित्त चिचगड रोडवरील नगरपंचायतचा  मैदान गर्दीने फुलनार असुन , शहरांसह ग्रामीण भागातून हजारो - लाखोच्या  संख्येत नागरीक मैदानावर दाखल होणार आहेत.



दरवर्षी देवरीत दसरा उत्सव समीती सूपर २४ तर्फे,  वेगवेगळे आकर्षक, सांस्कृतीक  कार्यक्रम, शहरात राम सीता झाकी व फटांक्याची जोरदार आतीष बाजी केली जाते. तर या वर्षी  दसरा उत्सव समीती सूपर २४ ने शहरात विशेष करुन हरियाणाचे बंजरगी देवनगरीत राम सीता सोबत  रावन दहनाला येनार असून भव्य देखावे तयार करनार आहेत. त्या निमित्ताने देवरी दसरा उत्सव समीती सूपर २४ जोरदार तय्यारीला लागुन आहे.  या महोत्सवात धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांसह विविध स्पर्धाही घेण्यात येतात. दसऱ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या या रावण दहन कार्यक्रमास जिल्हाभरातून हजारो - लाखोंच्या संख्येने नागरीक उपस्थित राहणार आहेत. १३ ऑक्टोंबर  रात्री  ९.३० वाजता ५१ फुट उंच रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे.


फटाक्यांच्या आतिषबाजीने उजळणार देवनगरी...

रावणाचा पुतळा दहनप्रसंगी देवरी नगरपंचायत मैदानावर नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात येणार आहे. विशेष म्हणून यासाठी प्रदुषण मुक्त फटाक्यांचा वापर करण्यात येनार  असल्याची माहिती दसरा उत्सव समीती सूपर २४ च्या पदाधिकार्यांनी  दिली आहे. यात कलर तोफ, आवाजाचे फटाके आदींचा समावेश असणार आहे. या आतिषबाजीने देवरी शहर  उजळून निघणार आहे.

मैदानात रामलीलेत प्रभू श्रीराम-रावणाचे युद्ध तर बजरंगीची प्रमुख भुमीका...

रावण दहना अगोदर नगरपंचायतच्या  मैदानावर कलावंतांच्या वतीने रामायणातील विविध प्रसंग सादर करण्यात येनार आहेत. दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीराम-रावणातील युद्ध व रावण वधाचा प्रसंग सादर करण्यात येणार आहे. तर हरियाणाच्या बंजरगीची विशेष भुमीका यावर्षी हजारो - लाखो  नागरीकांना पहायला मिळनार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या