Hot Posts

6/recent/ticker-posts

पानटपरी वरील चर्चेतुन गोंदिया शहर पोलीसांनी सिनेस्टाईल पध्दतीने केला खुनाचा उलघडा..

 


गोंदिया,दि.05 ;

       गौतमनगर, गोंदिया परिसरात ६ ते ७ लोकांनी मिळून एका इसमाचा खुन करुन त्याचे प्रेत जंगलात जमीनीत पुरलेले आहे, अशी चर्चा दि. ३०/०९/२४ रोजी गौतमनगर येथील पान टपरीवर सुरु होती. सदर चर्चा पोलीसांच्या एका खब-याने ऐकताच ती माहिती त्याने पोलीस उपनिरीक्षक घनश्याम थेर यांचे मार्फतीने गोंदिया शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार किशोर पर्वते यांना दिली..... ठाणेदार गोंदिया शहर यांनी त्यांचे स्टॉफ सोबत गुप्तरित्या पुर्ण परिसर पिंजून काढला परंतू त्या परिसरात कोणीही इसम गुम किंवा हरविला आहे अशी कोणतीही तक्रार किंवा माहिती मिळून आली नाही... तसेच त्या परिसरात कुठेही मारहाणीच्या निशाणी किंवा माहिती मिळून येत नव्हती. पानटपरीवर ज्या भागात मृतकाचे मृतदेह दफन केल्याबाबत नागरिक चर्चा करीत होते, त्या भागाची पाहणी केली असता सदर भागात झुडपी जंगल असल्याने व जंगली जनावरे असल्याने प्रेत दफन केल्याचे ठिकाणाचा शोध घेणे शक्य होत नव्हते. ठाणेदार यांनी दिनांक ०२/१०/२०२४ चे पक्या बातमीवरुन त्यांचे स्टॉफसह मध्यरात्री गौतमनगर गोंदिया चे दक्षीण दिशेला असलेली स्मशान भुमीमधील झुडपी जंगल पिंजुन काढुन मृतकाचे प्रेत ज्या ठिकाणी खडयात पुरुन ठेवले होते, त्या खड्याचा शोध घेवुन मृतकाचे प्रेत रितसर दंडाधिकारी यांचे समक्ष सर्व कायदेशिर प्रक्रिया चे पालन करून खड्याबाहेर काढले.



सदर प्रेताचे फोटो परीसरातील लोंकांना दाखविले असता त्यातील काही ईसमांनी सदरचे प्रेत हे विक्रम बैस रा. गौतमनगर हयाचा ड्रायव्हर शांतनु पशिने हयाचे असयल्याचे ओळखले. त्यानंतर विक्रम बेस रा. गौतमनगर याचेबाबद चौकशी केली असता तो आपले परिवारासोबत घराला कुलुप बंद करुन फरार असल्याबाबद समजले. तसेच विक्रम बेस याचे सोबत राहणारे इतर ०३ ते ०४ ईसम हे सुध्दा फरार असल्याचे चौकशीत दिसुन आले त्यामुळे हे सर्व घरुन फरार असण्याचे व मृतकाचे हत्येसी काहीतरी संबध असल्याचे शंसयावरुन त्या दिशेने तपास करुन त्यातील विक्रम बैस याचे एका मित्राला नामे विकास ओमप्रकाश गजभिये याला पकडले असता त्याने मृतक शांतनु पशिने याचे हत्येचा संपुर्ण घटनाक्रम सांगुन हत्येच्या गुत्थीची ऊकल केली. यात मृतक शांतनु पशिने हा विक्रम बैस याचे इंटर्टीका चार चाकी गाडीवर ड्रायवर म्हणुन कामाला होता. मृतकाने विक्रम बैस याचेकडुन ८० हजार रुपये उधारी घेऊन कामावर सुध्दा येत नव्हता. त्यमुळे विक्रम बैस, त्याची पत्नि किरण बैस, मुलगा चित्ता बैस व त्याचे इतर साथीदार यांनी मृतक यास गौतमनगर स्मशान भुमीचे झुडपी जंगल परिसरात नेऊन उधारीचे नेलेले पैसे परत करीत नाही व कामावरही येत नाही म्हणुन लाठ्या-काठयांनी बेदम मारहान करुन जिवानिशी ठार केले. व सदरची घटना कोणसही माहीत होऊ नये म्हणुन मध्ये रात्री वेळी मृतकाचे प्रेत गौतमनगर स्मशान भुमीला लागुन असलेल्या झुडपी जंगलात पाच फुट खोल खड्डा खोदुन पुरावा नष्ट करण्याचे दृष्टीने जमीनीत पुरुन ठेवला.

यामध्ये मृतक कोण आहे, त्यास नेमके कोणत्या ठिकाणी दफन केले, आरोपी कोण आहेत, याबाबत काहीही माहिती नसतांना सुध्दा सिनेस्टाईल पध्दतीने खुनाचा उलघडा केला, गोंदिया शहर पोलीसांनी मृतकाचे मृतदेहाचा शोध घेवुन त्यास खड्याबाहेर काढले असता  मृतक नामे - शांतनु अरविंद पशिने वय ३६ वर्ष, रा. मोहगाव, पोष्ट गंगेरुवा, जिल्हा शिवनी, मध्यप्रदेश राज्य असे निष्पन्न झाले. सदर मृतक यास गौतमनगर गोंदिया येथील आरोपी नामे....

१) विक्रम उर्फ विक्की पवन सिंग बैस, वय ३६ वर्ष,

२) सौ. किरण विक्रम बैस, वय ३२ वर्ष,

३) चिता विक्रम बैस, वय १९ वर्ष,

 सर्व रा. गौतमनगर गोंदिया व त्याचे इतर ३ ते ४ सोबती असे मिळुन उधारीचे पैश्यावरुन मारपिट करुन मृतक यास जिवानिशी ठार केले, त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचे दृष्टीने त्याचे प्रेत जुना स्मशान घाट गौतमनगर, गोंदिया येथील झुडपी जंगलात सुमारे ५ फुट खोल खड्डा खोदुन जमीनीत दफन केले होते, सदर मृतक हा विक्रम बेस याचे वाहन चालविणारा होता.

पोलीस निरीक्षक, किशोर पर्वते, गोंदिया शहर यांचे तक्रारीवरुन पो. स्टे. ला अपराध क्रमांक ६२४/२०२४ कलम १०३(१), २३८, ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.... सदर गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात सपोनि. वैभव गेडाम पोलीस ठाणे गोंदिया शहर हे करीत आहेत. सदरचे क्लिष्ट गुन्हयाची उकल मा. श्री गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक,गोंदिया, यांचे निर्देशान्वये श्री. साहिल झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन गोंदिया शहर चे ठाणेदार, पो. नि. श्री. किशोर पर्वते, स.पो.नि. वैभव गेडाम, धिरज राजुरकर, पो.उपनि. मंगेश वानखडे, अक्षय चन्नावार, घनश्याम थेर, पोलीस अंमलदार भाटिया, शेख, भेंडारकर, टेंभरे, बिसेन, चौव्हाण, लोंदासे, सोनवाने, इंदुरकर, रावते, बारेवार, बिसेन, लांजेवार यांनी  सदरची कार्यवाही केली आहे.  सदर क्लिष्ट गुन्हयाची उकल केल्याबाबत मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया यांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या