Hot Posts

6/recent/ticker-posts

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवरी पोलिसांचा चोख बंदोबस्त...


 महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी, निर्भया पथकांस पोलिस सतर्क...

देवरी,दि.04; (मुकेश खरोले..🖋️)

       नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देवरी शहर पोलिस सतर्क आहेत. नवरात्रोत्सव निमीत्त शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. गोपनीय शाखांसह दहशतवादीविरोधी पथकांचीही करडी नजर राहणार आहे. मॉ.धुकेश्वरी मंदिर व मंदिर परीसरात यात्रोत्सवासाठी जादा फौजफाटाही लावला असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया आणि दामिनी पथकेही सज्ज केली गेली आहेत. शहरातील मॉ धुकेश्वरी मंदिरात  सालाबादप्रमाणे यात्रोत्सव आहे. लाखो भाविक यानिमित्ताने यात्रेत येतात. विशेषत: महिलांची लक्षणीय गर्दी असते. पहाटे सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मॉं धुकेश्वरी  देवी मंदिरात भाविकांची रेलचेल असते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवणात आला आहे.

तर, देवरी पोलिसस्टेसन हद्दीत  स्थापीत  दुर्गा व शारदा मंडळातही भाविकांची मोठी गर्दी असते. पोलिस निरीक्षक प्रविन डांगे  यांच्या निगरानीत  पोलिस ठाणे गद्दीतील मंडळात  कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तर, मॉं धुकेश्वरी मंदिर येथे अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करन्यात आले आहे. यात्रोत्सवात चोऱ्या, दागिने ओरबाडणे, चेनस्नॅचिंग या सारख्या गंभीर घटना लक्षणीयरित्या वाढतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी देवरी पोलिस सतर्क झाले आहेत. 

प्रत्येक तासाला गस्त...

मॉं धुकेश्वरी मंदिरासह शहरातील दुर्गा व शारदा मंडळात  नवरात्रोत्सवानिमित्त दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पहाटेपासून महिला दर्शनाला येतात. याच संधीचा फायदा घेत चेनस्नॅचर्सकडून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोती खेचुन नेने पॉकीट मार असले प्रकार घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढविली आहे. यात्रोत्सवासाठी जादा बंदोबस्त तैनात केला आहे. गस्ती पथके दर तासाने शहर-परिसरात गस्त घालायला सुरूवात केली  आहे. यात्रोत्सव मार्गावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.

मदतीसाठी डायल ११२...

नवरात्रोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ डायल ११२ यावर संपर्क साधण्याचे आवाहन देवरी पोलिसांनी केले आहे. यात्रोत्सवाच्या गर्दीत पॉकिट मार, महिला, लहान मुले यांच्या अंगावरील दागिने चोरी जात असल्याने त्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी जागोजागी पोलिस तैनात केले असून करडी नजर ठेवली आहे.

प्रतिक्रीया ....


'' शहरातील मॉ धुकेश्वरी मंदीर व स्थापीत दुर्गा व शारदा मंडळात नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली आहे. पोलिसांनाही सतर्कतेसाठी पोलिस सज्ज आहेत. विशेष पथकांकडून गस्त सुरू आहे.''- प्रविन डांगे (पोलिस निरीक्षक देवरी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या