Hot Posts

6/recent/ticker-posts

निवडणूक खर्चाचे सुक्ष्म निरीक्षण करा- कपील कपूर

 


खर्चाचा दररोज अहवाल पाठवा...

गोंदिया, दि.26: 

     निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून विधानसभा निवडणूक कालावधीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे सुक्ष्म निरीक्षण करावे, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक कपील कपूर यांनी दिल्या.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली असून निवडणूक कामकाजातील खर्च विषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

स्थायी निगराणी पथकामार्फत सुध्दा नियमित व्हिडिओ रेकॉर्डींग होणे आवश्यक आहे. रोख व मद्य पकडणे या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डींग आवश्यक असून प्रत्येक घटनाक्रमाचा पुरावा गोळा करण्यात यावा. रोख पकडल्याची घटना निदर्शनास आल्यास या घटनेची माहिती तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक खर्च निरीक्षक व आयकर खात्याला द्यावी व त्या आधारेच पुढील कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच निवडणुकीत कार्यरत असलेल्या विविध विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांचा कामकाजाविषयी आढावा घेऊन योग्य त्या सूचना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या