Hot Posts

6/recent/ticker-posts

सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला


देवरी,दि.03 ; 

   दिनांक ०२/१०/२०२४ रोज बुधवारला स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ए. एम. खतवार सर, प्राचार्य, तसेच प्रमुख अतिथी श्री. आर. एल. मेश्राम, एकेडमिक इन्चार्ज, श्री. ए. डी. मशीद, विभाग प्रमुख स्थापत्य अभियांत्रिकी, श्री. आर. एस. नंदनवार, विभाग प्रमुख संगणक अभियांत्रिकी व श्री. एम. एम. तरोणे, विभाग प्रमुख अनुविद्युत अभियांत्रिकी हे होते.  

 याप्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन व पूजन करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंगातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  श्री. आर. एल. मेश्राम सर तसेच संचालन कु. एम. एम. नाकाडे मैडम व आभार प्रदर्शन कु. आर. के. राऊत मैडम यांनी केले.

तदनंतर विद्यालय परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एकंदरीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम विद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थांच्या उपस्थितीत शांततेत सुव्यवस्थीतपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या