Hot Posts

6/recent/ticker-posts

देवरी नगरपंचायतच्या अख्यारितील शौचालयांची अवस्था दयनीय, देवनगरीत धक्कादायक वास्तव...


देवरी,दि.03 ; (मुकेश खरोले..🖋️)

      देवरी नगरपंचायत ही जिल्ह्यातील  स्मार्ट नगरपंचायतीपैकी एक आहे. तसेच देवरी शहर हे महामार्गावरील मुख्य दर्जाचे शहर आहे. पण याच स्मार्ट सिटी म्हणून घेणाऱ्या शहराच्या अनेक शौचालयांमध्ये तुम्ही जाऊ शकता का?  याचे उत्तर येणार ते म्हणजे "नाही". देवरी नगपंचायतने  ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी करोडो रुपये खर्च केले पण काही वर्षातच  सार्वजनिक शौचालय अत्यंत घाणेरड्या अवस्थेत असल्याचं वास्तव आज समोर आहे. 

नगरपंचायतला परमानन्टं मुख्याधिकारी नसल्याने सगळी कामे भगवान भरोसे सुरू आहेत. तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने तक्रार करावी तरी कुनाला हा प्रश्न शहरातील नागरीकांत  कायम आहे. शेकडो स्वच्छता कर्मचारी देवरी नगरपंचायतला असले तरी स्वच्छता कर्मचार्यानां आदेश करनारे मुख्याधकारी नगरपंचायतला नाही. त्यामुळे शहरातील  शौचालयांमध्ये स्वच्छता राखण्याचे आदेश स्वच्छता कर्मचार्याना कोनी देनारा  नसल्याचं दिसून येतय.

बाजाल चौक व नगरपंचायत क्रिडांगनातील शौचालयांची दयनीय अवस्था...

देवरीचे ह्रदय असलेले बाजार चौक व शहराचे श्वास असलेेले नगपंचायतचे क्रिंडागन येथे येनार्या जानार्यांची  संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र त्यांच्यासाठी बाजार चौकात व क्रिडांगनात  देवरी  नगरपंचायत तर्फे बांधण्यात आलेल्या शौचालयाची देखील अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. चिचगड रोड वरील बाजार  परिसरात दर आठवड्याला मगंळवारी आठवडी बाजार भरतो ज्यामुळे बाजरात येनारे हजारो व्यापारी या शौचालयाचा वापर करतात पण या शौचालयांच्या स्वच्छतेकडे नगरपंचायतचे लक्ष नल्याने  अस्वच्छ दुर्गंधीयुक्त शौचालय असल्याचं अवस्था  आहे. 

देवी नगरपंचायतच्या शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि स्वच्छतेसाठी करोडोंचा निधी खर्च करते. मात्र त्यातून देवरीकरांना कशा प्रकारची सुविधा मिळते हेच या  मधून दिसून येते.  हे तर देवरी  शहरात आणि प्रमुख भागांमध्ये शौचालय आहेत. पण देवरी नगरपंचायत अंतर्गत मधील क्रिडांगनात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची सत्य परिस्थितीचा विचार देखील करता येणार नाही इतकी भयावह आहे. 

महिलांसाठी मोठं दिव्य...

देवरीतील सार्वजनिक शौचालयांची अवस्था आपण पाहिलीच पण यात सर्वाधिक कुचंबना होते ती महिलांची. कारण देवरीमध्ये फक्त महिलांसाठी असलेले शौचालय अतिशय कमी आहेत. सार्वजनिक शौचालयांच्या बाजूलाच महिलांसाठी एक किंवा दोन शौचालय बांधलेले असतात. मात्र त्या शौचालयांमध्ये असलेली अस्वच्छता पाहून अनेक महिला तिथं जाणं टाळतात.  एकतर अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त शौचालय  त्यामुळे अनेक महिला त्या शौचालयात जाने टाळतात. निदान भविष्यात तरी देवरीतल्या शौचालयांची परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा देवरीकरांकडून व्यक्त करण्यात येतेय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या