Hot Posts

6/recent/ticker-posts

दसऱ्याला झेंडू खाणार भाव, उत्पादन घटले...


देवरी,दि.09 : 

      यंदा पावसाने प्रमाण जास्त असल्याने झेंडूच्या फुलांचे उत्पादन घटल्याने यंदा दसऱ्याला झेंडूची फुले चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे अधिक मिळण्याची शक्यता आहे.

दसरा सणाला झेंड़ूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. घराला तसेच दुकानांना तोरण बांधणे, सजावट, वाहनांना तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात. त्यामुळे मागणी लक्षात घेता, विक्रीतून चांगली कमाई होईल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु यंदा गोंदिया जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम फूलशेतीसह झेंडूच्या फुलांच्या उत्पादनावर झाला आहे. अतिरीक्त झालेल्या पावसामुळे झेंडूच्या फुलांचे उत्पादनात घट झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात  झेंडूच्या फुलांच्या उत्पादनात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्याचा ग्रामीण भागांत फूलशेती केली जाते. पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी झेंडूची केलेली लागवड अतिरीक्त पावसामुळे उत्पादनात घट देणार आहे. परंतु बाजारात पुरेसा माल येणार नसल्याने ज्यांचे उत्पादन भाव चांगले राहणार आहे, त्यामुळे  शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या