Hot Posts

6/recent/ticker-posts

टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले...



 देवरी,दि.23 : 

       विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आज दिनांक २३/१०/२०२४ रोज बुधवारला  स्थानिक छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरी येथून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. मा. गटशिक्षणाधिकारी, पं.स. देवरी तर्फे राष्ट्रीय मतदार जागृती करण्याकरिता विद्यालयातून देवरी नगरात मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यासंबधीचे निर्देश दिल्या गेले. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिनांक २३/१०/२०२४ रोज बुधवारला ला सकाळी ०८:०० वाजता प्राचार्य श्री. एम. जी. भुरे सर यांनी हिरवी झेंडी दाखवून छत्रपती शिवाजी संकूल येथून मतदार जनजागृती रॅलीला सुरुवात केली. देवरी नगरीत विद्यार्थ्यांनी घोषवाक्य, म्हणी, गाणी गावून तसेच पथनाट्य सादर करून मतदार जनजागृती केली.

 या मतदार जनजागृती रॅली आयोजनामध्ये विद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक तसेच नववी ते बारावीच्या विद्यार्थांनी व पालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या