Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हात दुर्गा - शारदा मूर्ती प्रतिष्ठापना ; पोलीसांचा असनार चोख बंदोबस्त...

 


4 उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे असनार संपुर्ण नियंत्रण...

गोंदिया, दि.03 ;

    03 ऑक्टोबंर   ते 12 ऑक्टोबंर  या कालावधीत नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहाने साजरा होणार आहे. आज दि. 03 ऑक्टोंबरला (गुरुवार) ला घटस्थापना, दिनांक-11 ऑक्टोंबर  शुक्रवार ला (दुर्गाष्टमी), व महानवमी व दिनांक- 12 ऑक्टोंबर  शनिवार ला विजयादशमी (दसरा सण) व (धम्मचक्र प्रवर्तन दिन) साजरा होणार आहे. नवरात्रौत्सव निमित्त सार्वजनिक ठिकाणी श्री. दुर्गा/शारदा देवी मुर्तीची प्रतिष्ठापना  पुजन करण्यात येणार असून, देवी मंदिरात मोठया संख्येने ज्योतिकलश ठेवण्यात येतात. त्या दरम्यान सार्वजनिक मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवून मोठ्या भक्तीभावाने उत्सव साजरा करण्यात येतो. अशाप्रकारे नवरात्रोत्सव  मोठ्या उत्साहात जिल्ह्यात संपन्न होणार आहे.    

त्यानुसार सदर नवरात्रोत्सव निमित्याने शासन व स्थानिक प्रशासना कडुन विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर उत्सव शांततेत व सौहार्दपुर्ण वातावरणात उत्साहात  साजरा व्हावा यासाठी  वरिष्ठांकडुन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर उत्सव हा शांततापूर्वक संपन्न व्हावा हा बंदोबस्ताचा मुख्य उद्देश आहे. 

गतवर्षी 2023 ला नवरात्रोत्सव गोंदिया जिल्ह्यात सार्वजानिक दुर्गा मूर्ती- 585 शारदामुर्ती- 575, ची प्रतिष्ठापना करण्यात आले होते. त्याचप्रमाणे रावणदहन- 29, गरबा- 32 ठिकाणी सार्वजनिक रित्या आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी उत्सव अतिशय उत्साहात, शांततेत, कायदा सुव्यवस्था राखून शांततेत पार पाडण्यात आले. 

यावर्षी नवरात्रोत्सव सण- 2024 ला संभाव्य दुर्गा - शारदा मूर्तीची प्रतिष्ठापन...

गतवर्षीच्या तुलनेत 2024 मध्ये गोंदिया जिल्ह्यात संभाव्य  एकूण सार्वजानिक दुर्गा मूर्ती प्रतिष्ठापना- 598 ठिकाणी , शारदा- 589, रावणदहन -18,  गरबा- 39 चे  सार्वजनिकरित्या, आयोजन करण्यात येणार असून  हा  उत्सव साजरा करण्यात येणार आहे..

नवरात्रोत्सव- 2024 च्या निमित्याने गोंदिया जिल्हा पोलीस बंदोबस्त...

मा. पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे, यांचे संपूर्ण नियंत्रणात आणि मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक, कॅम्प देवरी श्री. नित्यानंद झा,  यांचे संपूर्ण देखरेखीखाली गोंदिया जिल्ह्यातील  गोंदिया, तिरोडा, आमगाव, देवरी या 4 उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे संपुर्ण नियंत्रणात आणि देखरेखीखाली उपविभागा अंतर्गत असलेल्या एकूण 16 पोलीस ठाण्याचे ठाणेदार, यांचे नेतृत्वात आणि संपूर्ण देखरेखी खाली यावर्षी  गोंदिया जिल्ह्यातील नवरात्र उत्सव शांतापूर्ण वातावरणात, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज करण्यात आले असून उत्सव पार पाडण्यात येणार आहे. 

गोंदिया जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी, यासाठी संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील   उपविभागअंतर्गत असलेल्या संपुर्ण 16 पोलीस ठाण्यातर्फे सार्वजनिक दुर्गा- शारदा उत्सव मंडळ ठिकाणी, गर्दी आणि रहदारीचे ठिकाणीं, फिक्स पॉइंट बंदोबस्त, त्याचप्रमाणे नाकाबंदी आणि गस्तीचे नियोजन करण्यात आले आहे...

नवरात्रोत्सव दरम्यान पोलीसांची कोणावर विशेष करडी नजर ... 

गर्दीचा फायदा घेऊन महीला, मुलींची छेड काढणाऱ्या, छप्रीबाजी, चीडीमारी करणाऱ्या टपोरी, खिसेकापू, चोरी, पॉकेटमारी करणाऱ्या विरूद्ध संपुर्ण 16 पोलीस ठाण्या अंतर्गत विशेष छेडछाड विरोधी पथके, गस्ती पथके तयार करण्यात आले असून या पथकांद्वारें विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून मोहीम राबविण्यात येवून कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे समाजकंटक, गुंड प्रवृत्तीच्या इसमावर खाजगी तसेच गणवेशातील महिला , पुरूष, पोलीस अधिकारी अंमलदार, चार्ली पथक, दामिनी पथक, यांना सक्रिय करण्यात आले असून यांची विशेष करडी नजर असणार आहे. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव काळात कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसम यांचे विरूद्ध तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. 

 कसा असेल पोलीस बंदोबस्त...

 जिल्ह्यातील 16 पोलीस ठाणे, अंतर्गत असलेले सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस मुख्यालय येथील आर.सी.पी, क्यू.आर.टी, पथक, सी-60 पथके, बी डी. डी. एस, मोटार परिवहन विभाग, बिनतारी संदेश विभाग, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सर्व शाखेतील पोलीस अधिकारी अंमलदार, त्याचप्रमाणे उत्सव संबंधाने पुरविण्यात आलेले  होमगार्ड, आणि राज्य राखीव पोलीस दल, अश्याप्रकारे संपूर्ण गोंदिया जिल्हा स्तरावर  साधारण 75 पोलीस अधिकारी, 600 पोलीस अंमलदार, 400 पुरुष होमगार्ड, 100 महीला होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हा स्तरावर नवरात्रोत्सव, शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलास सज्ज करण्यात आले आहे..

 कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताचे नियोजन...

अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता कायदा सुव्यवस्थाचे अनुषंगाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अतिरिक्त बंदोबस्त म्हणून जिल्हा आणि उपविभाग स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी 6 स्ट्राकिंग फोर्स, आणि नियंत्रण कक्षास राखीव बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे....एकंदरीत गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे उत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्या साठी बंदोबस्ताचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे.  गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेला, प्रतिष्ठित आणि सुज्ञ नागरिकांना नवरात्र उत्सव, सण शांततेत, सौहाद्रपूर्ण वातावरणात आपसी सामंजस्य ठेवून कायदा सुव्यवस्था राखून उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या