Hot Posts

6/recent/ticker-posts

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधा



 वय वर्ष 85 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांसाठी गृह मतदान सुविधा...

गोंदिया दि. 21 :  

       विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणताही मतदार आपल्या मतदानापासून वंचित राहू नये यादृष्टीने 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाचा लाभ उपलब्ध करुन दिला आहे.

नागरिकांमध्ये ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे, असे नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासह निवडणूक कर्तव्यानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यपध्दती विहित करुन दिली आहे. गृह मतदानासाठी नमुना 12-ड तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचबरोबर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना ही निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी नमुना 12-ड चे फार्म उपलब्ध करून देण्यात आले आहे.

निवडणूक कामाच्या विविध जबाबदारीसाठी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. यासाठी नमुना 12 साठी ज्यांची मागणी आली त्यांची पडताळणी करुन त्यांना मतदान पत्रिका दिलेल्या कालमर्यादेत मिळतील यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे असे निर्देश निवडणूक विभागाने दिले आहेत, ही संख्या अधिक असल्याने याबाबत योग्य तो समन्वय साधून मतपत्रिकांच्या आदानप्रदान बाबतची कार्यवाही दिलेल्या कार्यपध्दतीनुसारच करण्याचे त्यांनी निर्देश दिले. टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करु इच्छिणाऱ्या तसेच निवडणूक कर्तव्यासाठी प्रमाणपत्राद्वारे मतदान करु इच्छिणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे नमुना 12 व 12-अ  उपलब्ध करुन दिले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या