Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभा दंगल...आमगाव - देवरी विधानसभेत तिकीट कुणाची : भाजपमध्ये संभ्रम

 


भाजपमध्ये इच्छुकांची मोठी फौज तर विद्यमान आमदारांना अतिविश्वास....

गोदिया, दि. 02 ; (मुकेश खरोले..🖋️)

      येत्या काही दिवसांत विधानसभानिवडणुकीची आचारसंहिता लाणू होण्याचीशक्यता अहे. अशात तिकीटासाठीअनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्याआमगाव विधानसभा मतदारसंघातभाजपमधून अनेक जण गुडघ्याला बाशिंगबांधून बसले आहेत. मात्र भाजपश्रेष्टींनीअद्याप एकाही उमेदवारावर शिक्कामोर्तबकेले नाही. परिणामी सर्वाचे 'एकला चलोरे' सुरू आहे. काँग्रेसचे विद्यमान आ.सहेसराम कोरेटे अतिविश्वासात वावरतअसल्यामुळे त्यांना तोड देणाच्याउमेदवाराच्या शोधात असल्याची माहितीभाजपच्या आतील गोटातून मिळाली.आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात देवरी, आमगाव आणि सालेकसाचासमावेश आहे. सालेकसा आणि देवरी हे दोन तालुके प्रमुख्याने जंगलव्याप्त आणि लोकसंख्येच्या दृट्टीने आदिवासी बहुल आहेत. हा मतदारसंघ राखीव झाल्यापासून आतापर्यंत तीन आमदार झालेत. त्यात पहिले काँग्रेसच्या रूपाने रामरतन राऊत, त्यानंतर भाजपचे संजय पुराम आणि 2019 च्या निवडणुकीत कॉग्रेसचे सहसराम कोरोटे आमदार म्हणून निवडून आले. सद्यस्थितीत या मतदारसंघात कॉँग्रेसमध्ये आमदारांच्या तोडीचा कुणीच नाही. त्यामुळे विद्यमान आ. कोरेटे अति आत्मविश्वासात असल्याचे दिसून येत आहे. 

2019 च्या निवडणुकीत संजय पुराम यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी सातत्याने प्रचार कायम ठेवला. आता निवडणूक आल्याने गत तीन वर्षापासून भाजपमधील काहींनी तयारी सुरू केली. त्यात डॉ. श्रीकांत राणा, शंकर मडावी, अर्चना मडावी यांचा समावेश आहे. त्यांनीही तिकीटासाठी वरिष्टांकडे मागणी केली, मात्र अद्यापही भाजप श्रेष्टीनी कुणालाच होकार दिलेला नाही. या शर्यतीत संजय पुराम यांचा संपर्क, पुर्वाश्रमीचा अनुभव आणि त्यांनी उभारलेली कार्यकरत्यांची फळी या जोरावर, तर डॉ. श्रीकांत राणा उच्चशिक्षित, तरुण आणि जनसामान्यांत मिसळणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख असल्याने त्यांचे नाव इच्छुकांच्या यादीत अग्रस्थानी आहे. त्यानंतर शंकर मडावी यांचे समर्थक तिकिटासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आमगाव मतदारसंघातून भाजप ऐनवेळीकुणाला तिकीट देते..? हे पाहावे लागणार आहे.

जिल्हा कॉंग्रेसमध्ये 3 वेगवेगळे गट...

आमगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये विद्यमान आ. सहसराम कोरेटे यांनाच तिकीट मिळणार असल्याचा आशावादव्यक्त केला जात आहे. गत वर्षभरापासून निवृत्त अधिकारी राजकुमार पुराम यांनीही गावोगावी जाऊन भेटीगाठी सुरू केल्या. त्यामुळे त्यांचे नावही चर्चेत आहे. तसेच गड़चिरोली-विमूर लोकसभा क्षेत्राचे खा.नामदेव किरसान यांचे पुत्र दुष्यंत किरसानयांच्या चाहत्यांचा कॉँरग्रेसमध्ये पुन्ह्मा एक गट निर्माण झाला आहे. त्यामुळे नेमकी तिकिटासाठी कुणाची ताकद भारी पडते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या