Hot Posts

6/recent/ticker-posts

चिचगड ग्रामीण रुग्णालयाला समस्यांचा कॅन्सर; रुग्णांची हेळसांड

 


देवरी,दि.03 ; (मुकेश खरोले..🖋️)

    ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्यातील चिचगड येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली; परंतु आज या रुग्णालयाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून, हे रुग्णालय केवळ शोभेची वस्तू बनले आहे. या भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून १० ते १५ वर्षांपूर्वी  चिचगड  येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. सर्व सोयींनी युक्त असलेले हे ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे सुरू झाल्यामुळे परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले; परंतु हे समाधान फार काळ टिकले नाही.

आजच्या परिस्थितीत दवाखान्याची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली असून, याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. एक्स-रे मशीन नाही, टेक्निशियन नाही, अशी स्थिती आहे. पॅथॉलॉजी विभागातील रक्ततपासणी सीबीसी मशीनही नाही. त्यामुळे रुग्णांना येथून खाजगी किवां जिल्हा रुग्नालयात  रेफर करण्याचे प्रकार वाढले आहेत. रुग्णांना चिचगड येथील ग्रामीन रुग्नालयात अनेक मशीन उपलब्ध असले तरी आज स्थीतीत ते बिनकामी  पडुन आहेत . गंभीर रुग्ण रात्री उशिरा आल्यानंतर डॉक्टर दवाखान्यात उपलब्ध राहत नाहीत. 

अनेकदा तातडीच्या उपचाराकरीता रात्री दरम्यान तातडीने रुग्णालयात रुग्ण जातात परंतु त्याठिकाणी एकही डॉक्टर उपस्थित नसतात. दरम्यान, रुग्णाची तब्येत बिघडली असल्याने  त्यानां तालुक्याला किवां जिल्हा रुग्णालयात  जावे लागले. अनेकदा असल्या प्रकारामुळे  रुग्णाच्या नातेवाइकांनी याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे. दवाखान्याच्या दुरवस्थेबाबत अनेकदा जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्यमंत्र्यांकडे गावकऱ्यांनी तक्रारी केल्या परंतु याकडे सतत दुर्लक्ष होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या