Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदार व उमेदवारांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाचे विविध ॲप ; नागरिक व उमेदवारांनी ॲपचा वापर करावा - प्रजित नायर


 24 तासात होणार तक्रारीचे निराकरण.

विविध परवानग्या मिळणार ऑनलाईन ; पेड न्यूजवर समितीची नजर..

गोंदिया  दि. 18: 

     निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवार, मतदार व निवडणूक यंत्रणेच्या मदतीसाठी विविध सुविधा व अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहेत. सोबतच त्या त्या विषयाच्या अनुषंगाने विविध समित्या सुध्दा गठीत करण्यात आल्या आहेत. भयमुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणुकी दरम्यान या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

तक्रार देखरेख यंत्रणा :- निवडणूका जाहीर झाल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये तक्रार निकालात काढण्याकरिता तक्रार देखरेख यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

माहिती तंत्रज्ञान सुविधा :- भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विविध माहिती तंत्रज्ञान सुविधाचा वापर करण्याबाबत सामान्य नागरीक तसेच राजकीय पक्षांना सूचित करण्यात आले. यामध्ये खालील प्रमाणे माहिती तंत्रज्ञान सुविधाचा समावेश आहे.

एनकोर : विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास सदर अॅप्लिकेशनचा वापर करून त्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

सुविधा अॅप :- या वेब तसेच अँड्रॉईड अॅप्लिकेशनचा वापर करून उमेदवारांना निवडणूकीकरिता लागाणाऱ्या विविध परवानग्या प्राप्त करून घेता येईल. ही सुविधा उमेदवार व राजकीय पक्षांसाठी उपयुक्त ठरणारी आहे. निवडणुकी दरम्यान लागणाऱ्या विविध परवानग्यासाठी हे सुविधा अॅप आहे.

सक्षम उमेदवार अॅप : सदर अॅप्लिकेशन निवडणूक आयोगाकडून दिव्यांग मतदारांकरिता तयार करण्यात आले असून दिव्यांग मतदारांना आवाज सहाय्य तसेच अनुवादासाठी सदर अॅप्लिकेशनचा वापर करता येईल.

 सी-व्हिजिल :- निवडणूक व त्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी हे मोबाईल अॅप उपयुक्त ठरणारे आहे. याद्वारे नगरिकांच्या प्राप्त तक्रारी निर्धारित वेळेत निकाली काढल्या जातील.

सएमएस (निवडणूक जप्ती व्यवस्थापन यंत्रणा) :- या अॅप्लिकेशन द्वारा दारू, रोकड, मोफत वाटप, मौल्यवान धातू व प्रतिबंधीत औषधे यांची सखोल तपासणी करण्यात येईल. त्यामध्ये विविध शासकीय विभागाचे एकूण 16 समन्वय अधिकारी यांचेद्वारा नियंत्रण केल्या जाईल.

मतदार सहायता केंद्र :- मतदारांच्या सहाय्यतेकरिता जिल्ह्यात मतदार सहायता केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून मतदारांना सहायता करण्यात येणार आहे.

मतदारांसाठी टोल फ्री क्रमांक :- मतदारांच्या सहाय्यतेकरिता जिल्ह्यात 1950 हा टोल फ्री क्रमांक भारत निवडणूक आयोगाद्वारा जाहिर केलेला आहे. मतदारांनी या क्रमांकावर कॉल केल्यास त्यांना विविध प्रकारची सहाय्यता व मार्गदर्शन केले जाणार आहे.

एमसीएमसी समिती :- सोशल तसेच डिजिटल मिडीया (इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल्स ) या द्वारा प्रसारीत होणाऱ्या जाहिराती, संदेश, बल्क एसएमएस, व्हाईस मेसेज, रेडिओ, एफएम, वृत्तपत्र आदी माध्यमातून देण्यात येणाऱ्या जाहिराती व पेडन्युज यावर नियंत्रण ठेवणे तसेच त्यांचे प्रमाणकीकरण करणे याकरिता जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची (MCMC) स्थापन करण्यात आली आहे.

 स्वीप :- मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम अंतर्गत मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने स्वीप कार्यक्रम सुरू केला असून मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग वाढविण्याकरिता जिल्ह्यात स्वीप समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या