Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रेकिंंग....लाखोच्या गांज्यासह दोन आरोपी ताब्यात; देवरी पोलिसांची कारवाई

 


                      24 प्याकेट ओला गांजा जप्त...

देवरी,दि.05 ; 

    रायपुरकडुन देवरी मार्गे नापुरकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनामधून देवरी पोलिसांनी आज दि.05 ऑक्टोंबर शनिवार रोजी रात्री 8.30 वाजता दरम्याम शिरपुर/बांध येथिल सिमा शुल्क तपासनी नाक्याजवळ बंदोबस्त लावत  ओल्या गांज्याचे  24 प्याकेट  जप्त केले आहे. ज्यामुळे परराज्यातन गांजाची बिनबोभाट तस्करी  होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या कारवाईत अटक केलेल्या दोघा आरोपींना देवरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सध्या  देवरी तालुक्यात चोऱ्या, दराेड्यांच्या घटनेवर काही प्रमानात आळा बसला असला तरी  उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांनी गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.


 शनिवारी रात्री देवरी पोलिसांना सुत्रानीं  माहिती दिली की,  रायपुर कडुन देवरी मार्गे नागपुर कडे एका चार चाकी वाहनात गांजा वाहतुक होत आहे. त्या आधारावर देवरी पोलिसांनी शिरपुर/बांध येथिल सिमा शुल्क तपासनी नाक्यावर नाकेबंदी केली. प्रत्येक वाहनाची तपासणी करून वाहन पुढे सोडण्यात येत होते. दरम्यान, आज (दि.05) शनिवारी रात्री 8.30 वाजताच्या  सुमारास  रायपुरकडुन देवरीमार्गे नागपुरकडे येत असलेला कार (RJ 08 TA 1836)  चालकाने नाकेबंदीदरम्यान जोरात चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क झालेल्या देवरी पोलिसांपुढे त्यांचा प्रयत्न फसला. पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेत गाडीची झडती घेतली. या वेळी गाडीच्या डिक्कीत गांजाची 24 पाकिटे आढळून आली. एक पाकीट 5 किलो वजन एकूण 120  किलो ओला गांजा आढळून आला. गांजा, कार, मोबाइल असा  लाखो रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.


पोलिस अधिक्षक गोरख भामरे , अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील व सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी सदरची कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या