Hot Posts

6/recent/ticker-posts

देवरी पोलीस स्टेशन हद्दीत जुगार खेळविणार्या ईसमांस केले हद्दपार.

 


देवरी,दि.14 : 

    देवरी पोलिस स्टेसनचे पोलीस निरीक्षिक प्रविण डांगे यांनी पोलीस स्टेशन देवरी हद्दीमधील इसम नामे राकेश दुलीचंद चव्हाण वय.३२ वर्ष रा. वार्ड क्र. १३ देवरी ता.देवरी जि. गोदिया हा जुगारखेळ खेळणे/खेळवित असल्याने सदर इसमावर यापुर्वीही देवरी पोलीस स्टेश्नला वारंवार गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच त्याला अप क्रमांक ३१३/२०२३ यामध्ये मा. न्यालयाकड़न शिक्षामिळाली व त्याचेवर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे. तरीही त्याच्यावर्तवणुकीत कोणताही बदल झालेला नुसन त्याने त्याचे बेकायदेशीर कृत्यांची कृती चालुच ठेवलेली आहे. त्यामुळे प्रचलित कायदयांन्वये कारवाई करुन सुध्दा त्याच्या वर्तणात कोणताच बदल होत नाही व कायदयाच्या धाक त्याचा मनात उरलेला दिसून येत नाही, त्याच्या वागणुकीमूळे देवरी शहरातील नवयुवक, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी असे सामाजिक संवेदनशिल घटकातील तरुण वर्ग या बाबीस बळी पडत आहेत. 

अशाप्रकारचे बेकायदेशिर कृत्ये रोखण्यासाठी,व दहशत कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब गोंदिया, नित्यानंद झा अपर पोलीस अधीक्षक साहेब गॉदिया कॅम्प देवरी , विवेक पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब देवरी यांचे मार्गदर्शनात व सुचणेप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५७ (१),(५) म.पो.का प्रमाणे प्रस्ताव तयार कंरुन पाठविले असता सदर प्रकरणाची मा. श्रीमती कविता गायकवाड उपविभागिय दंडाधिकारी सा.देवरी यांनी चौकशी व सुनावरणी करुन नमुद इसमाला देवरी, आमगाव,सालेकसा या तालूक्याच्या बाहेर ०२ महिन्याकरीता हद्दपार केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या