Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मसिस्ट दिवस व वादविवाद स्पर्धा संपन्न

 


देवरी,दि.01ऑक्टोंबर ; 

     कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी द्वारा संचालीत छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी, ( डी.फार्म / बी.फार्म ) देवरी जि. गोदिया या महाविद्यालयात फार्मसिस्ट दिनाचे औचीत्य साधून दिनांक २५ सप्टेबंर २०२४ रोजी जागतिक फार्मसिस्ट दिवस साजरा करण्यात आला. पार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधुन सर्व विद्यार्थांनी देवरी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली व फार्मसी अभ्यासक्रमाचे महत्व व कार्य याबद्दलची माहीती लोकांपर्यत पोहचविण्याचे काम केले. 

तसेच फार्मसिस्ट दिनाचे औचीत्य साधून दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी महाविद्द्यालयात वादविवाद स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये गोंदिया, चुलोद, आमगाव, खमारी येथील फार्मसी महाविद्यालयातील मुल-मुलींनी भाग घेतला होता.

आयोजीत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. कु. रिता सोयाम मॅँडम यांनी केले तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र शिराडकर हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अनिलकुमार येरणे,सचिव कृ.स.तं. शि.संस्था देवरी, डॉ. प्रियंका येरणे सहसचिव कृ. स.तं शि.संस्था देवरी त्याचप्रमाणे सौ. जयश्री येरणे कोषाध्याक्षा कृ.स.तं शि संस्था देवरी हे होते. या कार्यकमाला महाविद्य्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या