Hot Posts

6/recent/ticker-posts

पोलीस स्टेशन देवरी हद्दीत अवैध दारु विक्री करणा-या ईसमांस केले हृ्दपार.

 


देवरी, दि. 02 ; 

         मा.श्री पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब गोदिया, मा. श्री.नित्यानंद झा अपर पोलीस अधीक्षक साहेब गोंदिया कैंम्प देवरी , मा. श्री विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. देवरीचे मार्गदर्शनात व सुचणेप्रमाणे श्री., प्रविण डांगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी यांनी पो. स्टे. हद्दितील इसम नामें प्रमोद शहारे वय ४२ वर्ष रा. मुरदोली ता. देवरी जि.गोदिया याला हद्दपार केले आहे.

सविस्तर असे की,  हा इसम  पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैध दारु बाळगुन दारु विक्री करणे अशा प्रकारचे गुन्हें करीत असल्याने त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करने कामी मा. उपविभागीय दंडाधिकारी सा.देवरी यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१),(अ) प्रमाणे त्याचे विरुध्द प्रस्ताव तयार करुन पाठविले असता सदर प्रकरणाची मा. श्रीमती कविता गायकवाड उपविभागिय दंडाधिकारी सा. देवरी यांनी चौकशी व सुनावणी करुन नमुद इसमाला देवरी, आमगाव, सालेकसा या तालुक्याच्या बाहेर २ महिन्याकरीता हद्दपार केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या