Hot Posts

6/recent/ticker-posts

चिचगड पोलिसांची नवरात्रोत्सव मंडळांसोबत बैठक संपन्न ; नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करा - तुषार काळेल

 


देवरी, दि. 01 ऑक्टोंबर ; 

    नवरात्र उत्सवाच्या पार्श्भूमीवर चिचगड पोलिसठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक मंडळे, नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक  दि. 30 सप्टेंबर ला चिचगड पोलिस्टेसन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी, नवरात्र उत्सवात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी महिला व मुलींच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी. कोणताही अनुचितप्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. न्यायालयाच्या व शासनाच्या अटीशर्तीचे पालन करून नवरात्रोत्सव साजरा करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार काळेल यांनी केले.

सार्वजनिक मंडळांनी रस्त्यात अडथळा निर्माण होणार नाही, असे मंडप उभारावे. प्रबोधनात्मक देखावे अथवा फलक लावावे. गरबा खेळण्यासाठी महिला व मुली असल्याने मंडळांनी स्वयंसेवक नेमावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महिलांची छेडछाड़ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महिलांनीही दागदागिने सांभाळावेत. रावण दहन , नवरात्र उत्सव मंडळानीं दक्षता घ्यावी, आदी सुचना उपस्थितांना देण्यात आल्या.

पोलिसांकटून चोख बंदोबस्त ...

   चिचगड पोलीस ठाणे हद्दीमध्ये 20 ते 25  नवरात्र उत्सव मंडळे असून हि  मंडळे मिरवणूक काढत असतात. ज्यात काही मंडळे महिलांसाठी गरबाचे आयोजन करत असतात. चिचगड पोलीस ठाण्यामध्ये पोलिस कर्मचारी  देखरेखीसाठी नियुक्त करण्यात येणार असून पोलिस जवानही असणार आहेत. सर्व अधिकारी गस्त करणार असून पेट्रोलिंग व मार्शल पोलीस असणार आहेत. न्यायालय व शासनाचे नियमांचे पालन करून शांततेमध्ये उत्सव साजरा करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक  तुषार काळेल यांनी या सभे द्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या