Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत ; जिल्ह्यातील 569 ज्येष्ठ नागरिक करणार तीर्थक्षेत्रांची वारी


गोंदिया, दि. 4 : 

     14 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व धर्मियातील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

सदर योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात वैष्णोदेवी मंदिर कटरा (जम्मू व कश्मिर) तीर्थक्षेत्राकरीता 136 ज्येष्ठ नागरिकांची, श्रीराम मंदिर अयोध्या (उत्तरप्रदेश) तीर्थक्षेत्राकरीता 240, महाबोधी गया तीर्थक्षेत्राकरीता 33, काशी तीर्थक्षेत्राकरीता 26, विठोबा पंढरपूर तीर्थक्षेत्राकरीता 32, तिरुपती बालाजी तीर्थक्षेत्राकरीता 17, द्वारकाधीश तीर्थक्षेत्राकरीता 7, काशी विश्वनाथ तीर्थक्षेत्राकरीता 45, गंगोत्री मंदिर उत्तरकाशी तीर्थक्षेत्राकरीता 2, महाकालेश्वर उज्जैन मंदिर तीर्थक्षेत्राकरीता 10, साईबाबा देवस्थान शिर्डी तीर्थक्षेत्राकरीता 8, सिध्दीविनायक मंदिर तीर्थक्षेत्राकरीता 5, केदारनाथ तीर्थक्षेत्राकरीता 3, अजमेर दर्गा तीर्थक्षेत्राकरीता 3, जगन्नाथ पुरी तीर्थक्षेत्राकरीता 1, रामेश्वरम तीर्थक्षेत्राकरीता 1, असे एकूण 16 तीर्थक्षेत्राकरीता 569 ज्येष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिक लवकरच श्रीराम मंदिर अयोध्याची मोफत वारी करणार आहेत.

प्रतिक्रीया...

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेकरीता जिल्ह्यातील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, गोंदिया येथे आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

      - विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या