Hot Posts

6/recent/ticker-posts

5 ट्रॅक्टर, 2 दहा चाकी टिप्पर, 17 ब्रास रेती सह 67 लाख 93 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त


अवैध गौण खनिज रेती चोरी प्रकरणी 6 इसमांविरुद्ध गुन्ह्याची नोंद.. तर एका विरूध्द दंडात्मक कारवाई...

गोंदिया,दि.10 :

      पोलीस अधीक्षक गोरख भामरे, यांनी नवरात्र उत्सव व आगामी काळात महाराष्ट्र राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरूध्द कारवाईचे कडक धोरण अवलंबविले असून जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध कृती करणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच जिल्ह्यात विषेशतः अवैध गौण खनिज, रेती चोरी करणाऱ्याविरूध्द प्रभावी धाड कारवाई करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 


या अनुषंगाने जिल्ह्यातील अट्टल सराईत गुन्हेगारांविरूद्ध ,  तसेच अवैधरित्या रेती चोरी करणाऱ्या विरूध्द  तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध प्रभावी धाड कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत असून  दिनांक 09/10/2024 रोजी पहाटे व रात्र दरम्यान तसेच दिनांक 10/10/2024 रोजी चे पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच पो.स्टे. दवनीवाडा पोलीस पथकाने  अवैध गौण खनिज रेती (वाळू ) चोरी करणाऱ्याविरूध्द वेगवेगळ्या ठिकाणी धाड कारवाई करत विना परवाना अवैधरित्या रेतीची (गौण खनिज वाळू) चोरी करून वाहतूक करतांना मिळुन आल्याने 5 इसमाना ट्रॅक्टर ट्रॉली सह, तसेच दोघांना टीप्पर सह व चोरीचे रेतीसह, पकडण्यात आले.

गौण खनिज रेती चोरी प्रकरणी पो. ठाणे  दवनीवाडा येथे ट्रक्टर व  टीप्पर चालक आरोपी नामे....

ट्रक्टर चालक आरोपी नामे- १) पलास राधेशाम ठाकरे वय 25 वर्ष रा. अर्जुनी ता.तिरोडा,जिल्हा गोंदिया 2) आशिष ईश्वरीलाल चौधरी वय 26 वर्ष रा. अर्जुनी ता.तिरोडा, जिल्हा - गोंदिया 3) ओमप्रकाश ईश्वरीलाल चौधरी वय 25 वर्ष रा. अर्जुनी ता. तिरोडा, जिल्हा गोंदिया 4) मणीष दिनदयाल पटले वय 25 वर्ष रा. अर्जुनी ता.तिरोडा, जिल्हा -गोंदिया 

टीप्पर चालक आरोपी-  5) प्रविन अनिल कटनकार, वय 25 वर्ष, रा. पाटीलटोला (मुंडीकोटा) ता. तिरोडा जि. गोंदिया 6) यशोराज दिलीप चनाप वय 22 वर्ष रा. गराडा, ता. तिरोडा जि. गोंदिया.

 यांचेविरुद्ध  कलम 303(2), 3(5) भा.न्याय संहिता अन्वये वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले असून  7) आरोपी नामे -  *मनीष धनेद्र ठाकरे वय 22 वर्ष राहणार देवरी तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया  याचे विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.. नमूद आरोपीतांचे  ताब्यातून 5 ट्रॅक्टर ट्रॉलीसह ज्यात अंदाजे 5 ब्रॉस रेती, तसेच 2 टीप्पर ज्यामध्ये 12 ब्रास रेती असा एकूण किंमती  67 लाख, 93 हजार 500/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देश मार्गदर्शनाखाली स्थागुशा चे पो. नि. दिनेश  लबडे यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार पोहवा रियाज शेख, सोमेंद्रसिंह तुरकर, चित्तरंजन कोडापे भुवनलाल देशमुख,पोशि दुर्गेश पाटील यांनी तसेच पोलीस ठाणे दवनिवाडा चे ठाणेदार म. पोलीस निरीक्षक, वैशाली ढाले पोलीस अंमलदार, मिलकीराम पटले, गणेश ठाकरे, स्वप्निल भलावी मोहन टेंभेकर, यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या