Hot Posts

6/recent/ticker-posts

माझे झाड माझी जबाबदारी उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या 48 शाळांचा सन्मान...


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या आगळावेगळा उपक्रम...

 गोंदिया, दि.07 :

          दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा परिषद गोंदियाच्या वसंतराव नाईक सभागृहात, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती मार्फत 'माझे झाड, माझी जबाबदारी' या आगळ्यावेगळ्या उपक्रम अंतर्गत, जिल्ह्यातील वृक्षारोपण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 48 शाळांचा, सन्माननीय पदाधिकारी व अधिकारी यांच्या हस्ते ग्रामगीता, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माननीय योपेंद्रसिंह (संजय) टेंभरे, सभापती, वित्त व बांधकाम हे होते. तसेच प्रमुख अतिथी मध्ये उपशिक्षणाधिकारी डी व्ही दिघोरे सर, तिरोडाचे गटशिक्षणाधिकारी  विनोद चौधरी सर हे होते. त्यासोबतच अंबर बिसेन, नरेंद्र डहाके शिक्षण विस्तार अधिकारी,  नुकत्याच उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या प्रणया सोमकात भालेकर,  संदीप तिडके, जिल्हाध्यक्ष, किशोर डोंगरवार विभागीय अध्यक्ष उपस्थित होते.प्रास्ताविकेतून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप तिडके  यांनी  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आजपर्यंत केलेल्या समाज उपयोगी विविध कार्यक्रमाची माहिती दिली, तसेच शिक्षक, पालक आणि बालक यांच्यासाठी सदैव शिक्षक समिती कार्य करेल अशी हमी दिली. शिक्षक समिती मार्फत 'माझे झाड, माझी जबाबदारी'  या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांनी जवळपास 50,000 वृक्षांची लागवड केली. आजच्या घडीला ग्लोबल वार्मिंग चे झटके आपल्या आपल्याला अनुभवास मिळतात, त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लावून आपली वसुंधरा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी पार पाडण्याचे  आवाहन केले. मार्गदर्शनात विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,  किशोर डोंगरवार सर, अध्यक्ष, गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यांनी शिक्षक समितीने शिक्षकांसाठी, पालकांसाठी, बालकांसाठी, स्त्री शिक्षकांसाठी, केलेल्या कार्याच्या उल्लेख केला. माझे झाड माझी जबाबदारी हा कार्यक्रम अगदी यशस्वी यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व शाळांच्या अभिनंदन केले. मार्गदर्शनाच्या श्रुंखलेत शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र डहाके सर यांनी 'माझे झाड, माझे जबाबदारी' या उपक्रमाची प्रशंसा केली. तसेच यानंतर माझी शाळा, माझे विद्यार्थी व त्यांची गुणवत्ता असेही उपक्रम आपण राबवावे हे सांगितले. अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना  संजय भाऊ टेंभरे यांनी माझे झाड, माझी जबाबदारी, या उपक्रमाची मनापासून प्रशंसा  केली. आजच्या काळाची गरज ओळखून प्राथमिक शिक्षक समिती अगदी उत्कृष्ट कार्य करत आहे अशी एक प्रकारची पोच पावतीच त्यांनी समितीला दिली.कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नुकत्याच उपजिल्हाधिकारी या पदावर नेमणूक झालेल्या प्रणया समकांत भालेकर यांनी सुद्धा उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. आपल्यामधून किंवा आपल्या पाल्यांना जर कोणतीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल त्या संदर्भात काय करावे, अभ्यास करण्याची पद्धती, अचूक निर्णय घेऊन कॅरिअर निवडणे ह्या गोष्टी किती महत्त्वाचे असतात याबद्दल सांगितले. यावेळी संघटनेतर्फे जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी वर्ग यांचा सन्मान करण्यात आला सोबतच बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पाडण्यासाठी , विविध पदोन्नतीचे पदे भरण्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका निभवणाऱ्या शिक्षण विभागातील कर्मचारी वृंदांचा सत्कार सन्मानचिन्ह व ग्रामगीता देऊन संघटनेतर्फे करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन महिला जिल्हाध्यक्ष सौ ममता येडे  आणि जिल्हा कार्याध्यक्ष मुकेशकुमार रहांगडाले यांनी केले, तसेच आभार संचालक गौतम बांते यांनी केले.

        कार्यक्रमाला प्रामुख्याने  संदीप तिडके जिल्हाध्यक्ष, किशोर डोंगरवार विभागीय अध्यक्ष, संदीप मेश्राम जिल्हासरचिटणीस, सुरेश रहांगडाले जिल्हा नेते, सौ ममता येडे महिला जिल्हाध्यक्ष, प्रतिमा खोब्रागडे जिल्हा महिला सरचिटणीस, होमराज बिसेन जिल्हा उपाध्यक्ष, राजेन्द्रनाथ रहांगडाले जिल्हा मार्गदर्शक  शरद कुमार पटले राज्य कार्यकारिणी सदस्य,  मुकेशकुमार रहांगडाले, जिल्हा कार्याध्यक्ष, विनोद बडोले कार्याध्यक्ष, उत्तम टेंभरे जिल्हा कोषाध्यक्ष, ,वंदना झोडे, श्रीमती मीनाक्षी रहांगडाले, जिल्हा कोषाध्यक्ष,दादाजी पंधरे जिल्हा मार्गदर्शक,अशोक बिसेन, गौतम बांते,  विनोद बडोले, शोभेलाल ठाकूर, दिलीप लोदी ,सतीश दमाहे ,उमेश रंहागडाले ,श्री राजेन्द्र बोपचे , यु जी हरीणखेडे, अनिल वट्टी, नोकलाल शरणागत, राजू गाढवे, सेवकराम रहांगडाले, श्रीमती मीनाक्षी पंधरे, टी.एम. शहारे,श्री आशिष कापगते, रेवानंद उईके, के जी रहांगडाले, श्री सोमकांत भालेकर,गजानन पाटणकर,विनोद बहेकार,दिनेश बिसेन, सुभाष बोपचे,  के एल पटले, अनुप नागपुरे ,राजेंद्र नागपुरे, जीवन मशाखेत्री, दिनेश उके , विपेन्द्र वालोदे, विजेंद्र केवट, प्यारेलाल पटले, प्रवीण दमाहे, श्री दुर्योधन शेंद्रे,  श्री मनोज रहांगडाले, हिरालाल सोनवाने,   क्रिश कहालकर, ओमप्रकाश मस्के,नरेंद्र बनकर,  डी एम नाकाडे, भास्कर नागपुरे, नाजुकराम लंजे, यशवंत शेंडे, संजय मस्के, जयपाल रूखमोडे, तुलाराम ठवकर, श्रीमती सपना शामकुवर, उदाराम कापगते,  आर एस बसोने, आर एम लिल्हारे, अनिल पडळकर, अजय कुर्वे, गोरेलाल वरखडे, श्रीमती मीना देवरे, जी एम तुरकर, शुभम बोंद्रे, बी झेड माहुले,  मुरली निंबार्क, एस एम सारूक, दिलीप होटे, आर इ खापर्डे, के बी देशमुख,  गणेश कागणे, लखनलाल तवाडे, अंबिलाल उईके,वीरेंद्र खोटेले,  नरेंद्र अमृतकर, रोहित हत्तीमारे, श्रीमती ज्योती डाबरे, जोहानलाल मलगाम, वसंत नाईक,  रामकृष्ण बारेवार,  श्री लोकेश नाकाडे, श्रीमती प्रेमलता टेंभरे, हेतराम चौधरी, राजेश शेंडे, सी बी बोबडे, श्रीमती मंजुश्री लढी,  हेमकृष्ण टेंभुर्णी,  विशाल कछवाय,  आदी नी कार्यक्रम यशस्वी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या