Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील 247 शेतकऱ्यांच्या खात्यात 88 लाख रुपये जमा


महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना...

गोंदिया, दि.4 : 

     महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 11 हजार 836 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे अशा 11 हजार 836 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रु. 4669.77 लाख रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 247 शेतकऱ्यांना 88 लाख रकमेचा लाभ देण्यात आला आहे.

या प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील 72 शेतकऱ्यांनी अद्याप आपले आधार प्रमाणीकरण केले नाही. अशा शेतकऱ्यांनी नजीकच्या सुविधा केंद्र अथवा बँक शाखेत आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन शासनाने केले आहे. या योजनेमध्ये सन 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन वर्षामध्ये बँकेकडून पीक कर्जाची उचल करुन नियमीत परतफेड केली आहे अशा एकूण 23,018 शेतकऱ्यांना आजपर्यंत 73.67 कोटी रुपये लाभ देण्यात आला आहे. असे जिल्हा उपनिबंधक प्रशांत सोनारकर यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या