Hot Posts

6/recent/ticker-posts

देशासाठी प्राणांची बाजी लावून वीरमरण आलेल्या 216 हुतात्म्यांना मानवंदना, आदरांजली, श्रद्धांजली अर्पण



पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, गोंदिया येथे पोलीस स्मृती दिन- 2024 कार्यक्रमाचे आयोजन....संपन्न 

गोंदियी,दि.21: 

      पोलीस स्मृतीदिन- 2024 कार्यक्रमानिमित्त आज दिनांक- 21 ऑक्टोबर 2024 रोजी कवायत मैदान, पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथे  कर्तव्यार्थ असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी अंमलदार व शहीद जवान हुतात्म्यांना  शोक सलामीद्वारे मानवंदना देवून मा. वरिष्ठांचे हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. 



सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री. प्रजित नायर, पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री गोरख भामरे, सी.आर.पी.एफ. चे कमांडंट श्री. अमित मिश्रा व भारत राखीव बटालीयन-2, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 चे समादेशक सहायक श्री. कैलास पुसाम, यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.



 सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री. प्रजित नायर यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त संबोधीत करुन शहीद पोलीस अधिकारी व जवान यांच्या प्रति भावपुर्ण श्रध्दांजली आहे, ज्यांनी वेळोवेळी कर्तव्य पथावर अग्रेसर असताना लोकतंत्र रक्षणार्थ आपल्या जीवाची पर्वा न करता "आपला आज" देशवासीयांच्या "उद्यासाठी" हसत खेळत स्वतःचे प्राण अर्पण केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन 21 ऑक्टोबर हा दरवर्षी भारतभर पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगुन पोलीस स्मृती दिनानिमित्त थोडक्यात संदेश वाचवुन दाखविले.



 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा आहे. यावर्षी देखील (दिनांक-01/09/2023 ते 31/08/2024  या कालावधीत) संपुर्ण भारतामध्ये आपले कर्तव्य बजावित असताना शहीद झालेल्या एकुण 216 पोलीस अधिकारी व जवानांची नावे सहायक पोलीस निरीक्षक श्री किशोर मावस्कर व पोलीस उप- निरीक्षक श्री अंकित सोनवाने यांनी वाचुन दाखविले. शोक सलामी परेड मध्ये गोंदिया जिल्हा पोलीस दलातील प्लाटुन कमांडर पोउपनि अनिल डोंगरवार व अंमलदार तसेच भारत राखीव बटालीयन-2, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया येथील प्लाटुन कमांडर पोउपनि श्री.राहुल दिवाण व त्यांच्या अंमलदारांसह रापोनि गोंदिया श्री रमेश चाकाटे यांनी शहीद पोलीस स्मृतीदिन सलामीचे नेतृत्व करुन शहीदांना शोक सलामी देण्यात आली व सलामी परेड मधील पोलीस अंमलदारांकडुन प्रत्येकी तीन राऊंड हवेत फायर करण्यात आले.

सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. प्रजित नायर, पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर, पोलीस निरीक्षक तथा अति. कार्य. पोलीस उप- अधीक्षक (मुख्या.) श्री. प्रमोद भातनाते, भारत राखीव बटालीयन-2, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया येथील सहायक समादेशक श्री कैलास पुसाम व इतर पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच शहीदांचे कुटुंबीय हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मंजुषी देशपांडे मॅडम, गुरुनानक शाळा गोंदिया यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता रापोनि श्री रमेश चाकाटे, सफौ रोशन उईके, मुस्तफा सरवर पोहवा पंकज पांडे, चंद्रकांत बरकुंड, मंगला प्रधान, हुमेंद्र चौधरी, संतोष चौधरी, राज वैद्य, राजु डोंगरे, नैलेश शेंडे तसेच वाद्यवृंद पथक गोंदिया जिल्हा पोलीस चे पोहवा देविदास तायवाडे व त्यांची टिम व भारत राखीव बटालीयन-2, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.,15 बँड पथक येथील टिम यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या