Hot Posts

6/recent/ticker-posts

वन्यजीव सप्ताह - देवरी वन विभागाच्या वतीने 1 ते 7 ऑक्टोंबर पर्यंत विविध कार्यक्रम

 


देवरी,दि.02 ; 

      देवरी  विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहाला 1 ऑक्टोंबर पासुन ते 7 ऑक्टोंबर पर्यंत  सुरुवात करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धात्रक यानीं हिरवी झेंडी दाखवत देवरी शहरासह वनपरिक्षेत्रात वन्यजिव सप्ताह निमित्त (दि.01) रॅली काढन्यात आली . वन विभागातील अधिकारी  जंगल व त्याच्या अधिवासातील वन्यजीवांचे संवर्धन व त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?, हल्ला झाल्यास करावयाच्या उपाययोजना याबाबतची  माहिती नागरीकांना जनजागृतीच्या माध्यमाने   दिली जानार असून  प्रात्यक्षिके दाखविली जानार आहेत.

भारतातील सापांच्या ३६० जाती असून त्यापैकी मण्यार, नाग, घोणस, कुरशा इत्यादी प्रमुख विषारी जाती त्यांचे वर्णन केले. ते चावल्यास ती जागा धुवून घ्यावी, साफ करावी, रुग्णाला पळू देऊ नये, तत्काळ रुग्णालयात न्यावे. या भागात वनक्षेत्र अधिक असल्याने नेहमी बिबट्याचे दर्शन काहींना होते, त्यामुळे विद्यार्थांनी  शाळेत येता-जाता गाणी म्हणावी, बडबड करत जावे. शेतात काम करताना बॅटरी लावून काम करावे, पक्षी जखमी आढळल्यास वन विभागाला कळवावे, यासह विविध वन्य जिवांची जनजागृती वन्यजिव सप्ताह नमीत्त  करन्यात येनार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या