Hot Posts

6/recent/ticker-posts

सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे मोबाईल व्हॅनद्वारे EVM - VVPAT संदर्भात नवमतदारांना प्रशिक्षण देण्यात आले.


देवरी, दि.16 ; 

      आज दिनांक १४/०९/२०२४ रोज शनिवारला स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे मोबाईल व्हॅनद्वारे EVM - VVPAT संदर्भात नवमतदारांना प्रशिक्षण देण्यात आले.

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूका - २०२४ च्या अनुषंगाने मतदार जागृती करण्याकरिता निर्देश दिले आहेत. त्यानुसार नोडल अधिकारी श्री. पी. एम. नामुर्ते, नायब तहसीलदार, देवरी यांच्या वतीने देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रातील गावा-गावात मोबाईल व्हॅनद्वारे EVM-VVPAT संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. आज सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शिक्षण घेत असलेल्या युवा मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून श्री. पी. वाय. गजबे, श्री. डब्ल्यू. वाय. फुन्ने, श्री. एस. जी. ऊके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना EVM-VVPAT संदर्भात प्रशिक्षण दिले.

याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ए. एम. खतवार सर, प्राचार्य, श्री. आर. एस. नंदनवार सर, विभाग प्रमुख संगणक अभियांत्रिकी, कु. व्ही. जी. दिवाणे  मॅडम, प्रभारी विभाग प्रमुख अणुविद्युत अभियांत्रिकी, कु. जे. के. भेलावे मॅडम, प्रभारी विभाग प्रमुख स्थापत्य अभियांत्रिकी तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या