Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रहार संवाद यात्रे दरम्यान बचत गटाच्या महिला C.R.P चे प्रहार जिल्हाध्यक्ष भांडारकर यांच्या कडे साकडे

 


 म.आ.वि.महा.मं. चे ग्रामीण भागातील बचत गटाचे लेखापाल C.R.P. ची आर्थिक पिळवणुन...

गोंदिया ,दि.16 ; 

      तिरोडा/गोरेगाव विधानसभा छेत्रात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सुरु असलेल्या जनसंवाद यात्रे दरम्यान ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या महिला आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत काम करत असलेल्या महिला C.R.P व लेखापाल यांना अत्यल्प प्रमाणात प्रती बचतगट 100 रुपये मासिक प्रमाणे वेतन देण्यात येते.  त्याच बरोबर म.आ.वि.महा.म. च्या सामान काम करणारे उमेद अंतर्गत काम करत असलेल्या महिलांना सरसकट 6000/- रुपये मासिक वेतन देण्यात येते. वाढलेल्या महागाईच्या काळात महिलांना अत्यल्प तुट्या-पुंज्या पगारात महिनाभर ऑनलाईन, ऑफलाईन काम करुन गावांना भेटी देणे, तालुक्याच्या ठिकाणी किंवा कार्यालयाच्या ठिकाणी सभेला जाने हे आजच्या महागाई च्या काळात परवडणारे नाही. हे ग्रामीण भागातील महिलांची होणारी आर्थिक पिळवणूक आहे. 



म.आ.वि.महा.मं. अंतर्गत ग्रामीण भागात महिलांना सक्षम बनविण्यासाठी बचत गटा मार्फत काम करणाऱ्या C.R.P व लेखापाल महिला भगिनींचे पगार सरसकट उमेद प्रमाणे सम प्रमाणात करण्यात यावे. तसे न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षातर्फे ग्रामीण भागातील महिला बचत गट, C.R.P, लेखापाल यांच्यासह तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी ताकीद प्रहार जन संवाद यात्रे दरम्यान प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी यांनी माध्यमाद्वारे संबंधित यंत्रणेला दिली आहे. त्यावेळी प्रहार पंचायत समिती क्षेत्र प्रमुख विकास शेंडे, प्रहार कार्यकर्ता राजेश भेलावे, तसेच म.आ.वि.महा.मं. अंतर्गत येत असलेल्या बचत गटाचे C.R.P, लेखापाल युनियन चे तालुका अध्यक्ष रजनी हरडे, सचिव चंद्रकला कटरे, उपाध्यक्ष पोर्णिमा पंधरे, नमिता अंबुले, नलुताई आदमने, शालु पटले, ममता बावनथडे, मिनाक्षी बारबैले व असंख्य महिला उपस्थित होत्या.

त्याच बरोबर तिरोडा तालुकाप्रमाणे सालेकसा तालुक्यातील युनियन चे अध्यक्षा यांच्या वतीने भ्रमणध्वनी द्वारे प्रहारच्या या लढ्याला पाठिंबा असल्याचे तिरोडा तालुका अध्यक्ष रजनी हरडे यांना कळविले. आमच्या या हक्काच्या न्याय लढ्यात आम्ही स्वतः सालेकसा/ तिरोडा तालुक्यातील सर्व महिला भगिनी उपस्थित राहतील असे माध्यमासमोर जिल्हाध्यक्ष भांडारकर यांना हरडे यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या