Hot Posts

6/recent/ticker-posts

तरुणाचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू...



गोंदिया,दि.04 ; 

   सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बाम्हणी/ख. येथील नामे,पंकज छबिलाल गजभिये वय 23 या तरुणाचा ग्राम मुसामझोरवा जंगल परिसरातील, नाल्यामध्ये (दि.03)  अंदाजे दू. 2.00 वाजे दरम्यान बुडून मृत्यू झाल्यामुळे,गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 सविस्तर असे की, सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी येथील रहिवासी, पंकज गजभिये मित्रांसोबत पोळ्याचा दिवस असल्यामुळे, बाम्हणी गावावरून कमीत कमी ४ कि.मी.अंतरावर असलेल्या, खडकी टोल्यावरून ग्राम मुसामझोरवा जंगल परिसरातील नाल्यामध्ये आंघोळ करण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे, बुडून मृत्यू झाला. गावात माहिती होताच गावातील लोक ठिकाणावर जाऊन,सदर मृतकाचे शव पाण्याबाहेर काढून, शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले आहे.मागील दोन महिन्यापूर्वीच वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे,घरातील कर्त्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची नोंद देवरी पोलीस स्टेशन येथे केली असून,पुढील तपास बडोले हवालदार करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या