Hot Posts

6/recent/ticker-posts

तलावात आंघोळ करणे जिवावर बेतले

 


देवरी, दि.19 ; 

       देवरी तालुक्यातील ग्राम फुक्कीमेटा येथील वर्ग सहाविच्या विद्यार्थाला तलावात आंघोळ करने जिवावर बेतले आहे. तलावतील पाण्याचा अंदाच चुकल्याने त्या मुलाचा तलावाच्या पाण्यातच बूडुन मृत्यू झाल्याची दुरदैवी घटना  (दि.18) घडली आहे. मृतक नामे रोशन सावळाराम मेंढे वय बारा वर्ष या चिमुकल्याचा गावानजीक असलेल्या मामा तलावामध्ये दिनांक दुपारी  03.30  वाजे दरम्यान पाण्याचा अंदाज न समजल्यामुळे त्यातच  बुडून त्याच मृत्यू  झाला. त्यामुळे फुक्कीमेटा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

प्राप्त माहितीनुसार मृतक नामे रोशन मेंढे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुक्कीमेटा येथे इयत्ता सहाव्या वर्गात शिकत होता. दि.18 सप्टेंबर रोजी त्याच्या घरी श्राद्ध चा कार्यक्रम असल्यामुळे, सदर मुलगा शाळेत गेला नव्हता. दुपारी 03.30 वाजे दरम्यान रोशन हा गाव शेजारील तलावावर आंघोळ करण्यासाठी गेला असता, तलावातील पाण्याचा अंदाज न समजल्यामुळे त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावातील लोकांना माहिती होताच, लोकांनी  तलावाकडे धाव घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. 

एकुलता एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावांमध्ये शोकांतीका पसरलेली आहे. मृतक मुलाच्या वडिलांचा मृत्यू काही वर्षापूर्वी अपघातात झाला होता. मृतक मुलाला पाण्यातुन बाहेर काढत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले असून, पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या