Hot Posts

6/recent/ticker-posts

नागरिकांनी जागरुक रहावे चिचगड पोलीसांचे आवाहन...

 


देवरी,दि.08 ;

     सध्या सुरू असलेल्या गणेश उत्सवानिमीत्त नागरीकांनी  दक्षता व काळजी घेण्याचे आवाहन चिचगड पोलिस स्टेसनचे ठाणेदार तुषार काळेल यांच्या तर्फे करण्यात आले आहे. ज्यात नागरिकांना खालील प्रमाने सुचना देण्यात आलेल्या आहेत. 

 सध्या गणेशोत्सव हा सण दि.07/09/2024 रोजी पासून चालू झालेला आहे. गणेशोत्सव कालावधीत बरेच लोक हे घर उघडे ठेवून आरती किंवा इतर कार्यक्रमासाठी घराबाहेर जातात. त्यावेळी घरात कोणीही नसते याचा फायदा घेऊन घरामधील रोख रक्कम, मौल्यवान दागिने व मौल्यवान वस्तू यांची चोरी होण्याची शक्यता असते तरी सर्व नागरिकांनी आपले घरी चोरी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. काळजी घ्यावी.

गणेश उत्सव व गौरी आवाहन सणाचे  निमित्ताने बाहेरगावी असलेले नोकरदार, कामगार किंवा अन्य व्यवसायिक यांच्या घरातील महिला या  अन्य गावावरून एस टी बस ने किंवा ट्रॅव्हल्स ने मूळ गावी येतात. गावी येताना त्या त्यांच्यासोबत रोख रक्कम, मौल्यवान दागिने, मौल्यवान वस्तू घेऊन येतात. प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगमधून अशा वस्तूंची चोरी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रवासादरम्यान शक्यतो अशा वस्तू स्वतः जवळ बाळगू नयेत किंवा प्रवासात सोबत आणू नयेत. प्रवासादरम्यान चोरी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

एसटी स्टँड येथे एसटीमध्ये चढताना आपल्या गळ्यातील मौल्यवान दागिने (सोने, चांदी) यांची गर्दीमध्ये चोरी होण्याची शक्यता असते. आशावेळी एसटी बस मध्ये चढताना गर्दी न करता किंवा गडबड न करता सुरक्षितपणे बस मध्ये चढावे. एसटी स्टँड येथे आपली बॅग सोडून इतरत्र फिरू नये. आपल्या बॅगेची किंवा आपल्या मौलवान दागिन्यांची, वस्तूंची आपण स्वतः काळजी घ्यावी. तसेच एसटी स्टँड येथे गर्दीमध्ये किसे कापू पासूनही सावध राहावे. लहान मुलांची ही काळजी घ्यावी.

गौरी सणाचे निमित्ताने बरेच नागरिक गौरी यांना मौल्यवान दागिने घालतात किंवा त्यांच्यासमोर रोख रक्कम ठेवतात गौरी घरात असल्यामुळे घराचा दरवाजा बंद करत नाहीत. घराचा दरवाजा बंद न केल्यामुळे आपणास झोप लागल्यानंतर चोरी होण्याची शक्यता असते. आशावेळी शक्यतो मौल्यवान दागिन्यांचा, वस्तूंचा किंवा रोख रक्कमेचा वापर टाळावा.

गणेशोत्सव काळामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर गणपती बसवलेल्या असतात. त्यामुळे रस्ते अरुंद झालेले असतात. रस्ते अरुंद असल्यामुळे चार चाकी किंवा टू व्हीलर चालवणे अडचणीचे होते. आशावेळी पालकांनी आपल्या शालेय मुलांना चार चाकी किंवा टू व्हीलर चालवण्यासाठी देऊ नये. आपल्या मुलांचा अपघात होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. यामध्ये निष्काळजीपणा करू नये. बेकायदेशीरपणे कोणी वाहन चालवत असल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. 

आरस पाहण्यासाठी किंवा नातेवाईकांच्या किंवा मित्र परिवाराच्या घरी लहान मुला, मुलींना एकट्याला पाठवू नये. सोबत प्रौढ व्यक्ती असणे गरजेचे आहे. रात्रीची वेळी फिरणे शक्यतो टाळावे. आरस पाहण्यासाठी जातानाही आपल्या अंगावरील दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. आपल्या मुलांची गर्दीमध्ये कोठे छेडछाड होणार नाही याबाबतही दक्षता घ्यावी. 

कोणत्याही गणेश मंडळाने रात्री 10.00 ते सकाळी 06.00 वा.चे दरम्यान स्पीकर  चालू ठेवू नये किंवा अन्य वाद्य वाजवू नये. तसे निदर्शनास आलेस कोर्टात खटला पाठवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक,ब्लड प्रेशर, शुगर किंवा अन्य आजार असलेल्या व्यक्ती यांना त्रास होणार नाही याबाबत गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या