Hot Posts

6/recent/ticker-posts

आजपासून दणदणाट गणेशोत्सव शिगेला ; ध्वनीमर्यादेचे होणार मोजमाप

 


गोंदिया,दि.15 ;

       गणेशोत्सवाच्या पार्र्वभूमीवर भाविकांना रात्री उशिरापर्यंत देखावे पाहाता यावेत यासाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यत गणेश मंडळाना आरास व देखावे खुले ठेवण्यास पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. ऐरवी रात्री १० नंतर देखाव्यांसह ध्वनीक्षेपकांवरही बंदी असते. काल शनिवारपासून (ता.१४) तीन दिवसमध्यरात्रीपर्यत भाविकांना देखावे पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. सलग चार दिवस सुट्या असल्याने आरास पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. 

संगीतावर आधारित देखावे पाहताना डीजे वा ध्वनीक्षेपकांवरही मर्यादा राखावी लागणार आहे. भंग झाल्यास पोलिसांकडून यशावकाश गुन्हे दाखल होण्याचीही शक्यता आहे. वर्षभरातील काही दिवस सार्वजनिक उत्सवाच्या काळात मध्यरात्रीपर्यंतची मर्यादा शिथिल करण्यात येते. त्यानुसार गणेशोत्सवातील काही दिवस शिथिलता देण्यात आली आहे. यात अखेरच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचाही समावेश आहे. त्यामुळे शहर-जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे मध्यरात्रीपर्यंत पाहण्याची संधी भाविकांना मिळते.

तसेच,  देखावे पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी होणार आहे. तर शेवटच्या विसर्जन मिरवणुरकीमध्ये डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. त्याऐवजी पारंपारिक वाद्य वाजविण्यावर मंडळांनी भर दिला आहे. मात्र रात्री बाराच्या ठोक्याला सारेच बंद करावे लागणार आहे. 

ध्वनी मर्यादेकड़े नजर...

सार्वजनिक गणेश मंडळांकडून भाविकांना आकर्षित करण्यासाठी देखावे उभारले जातात. काही प्रबोधनात्मक तर काही डीजेचे संगीत अन् विद्युत रोषणाईचा मिलाप असतो. अशाच देखाव्यांवर पोलिसांची करड़ी नजर असणार आहे. रात्रीच्या वेळी शांतता क्षेत्रात ४০ तर निवासी क्षेत्रात ४५ डेसिबल ध्वनीमर्यादेची क्षमता आहे. या ध्वनीमर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्या मंडळांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सदरचे डेसिबलची मोजमाप करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून पोलिस ठाण्यांना यंत्र पुरविण्यात आले आहे.

लेझरवर बंदी...

 गेल्या वर्षी लेझर लाईटमुळे काही भाविकांच्या डोळ्याला इजापोहोचली होती. त्यामुळे लेजर लाईटचा वापर करण्यावर पोलिसांकडन बंदी घालण्यात आलेली आहे. तसे आढळून आल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकार्यांवर आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या