Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते तिरोडा शहरात वृक्षारोपण

 


तिरोडा,दि.16 ; 

     ग्रीन तिरोडा क्लीन तिरोडा उपक्रमांतर्गत दि.15 सप्टेंबर ला वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल टाकत शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण केले गेले. विशेष म्हणजे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तिरोडा शहारात पर्यावरण विकास व्हावा याकरिता १११ झाडे उच्च प्रजातीचे १० ते १२ फुट उंचीचे झाडे आमदार महोद्यांनी भेट दिले होते  त्यामधून तिरोडा शहरात बस स्टैंड समोरिल लाइन मध्ये आज ३२ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असे ग्रीन तिरोडा क्लीन तिरोडातर्फे एकूण ६३१ झाडांचे वृक्षरोपण आतापर्यंत करण्यात आले आहे.

  यावेळी प्रामुख्याने आमदार विजय रहांगडाले, डॉ हितेश मंत्री,नितिन रोहिले,गोविंद मंत्री,राजकुमार मंत्री,प्रदीप महादुले,अविनाश रोहिले,राजेश असाटी,राजेश गभने,प्रमोद (पिंटू) कोठे,एडवोकेट प्रणय भांडारकर,निशांत अग्रवाल,संतोष मेश्राम,डी के सींग,राहुल सिंग,सुवेद बघेले,रोशन नागपुरे,विलास आगाशे,मनीष चापले,लोकेश मेश्राम, डॉ. विद्या मन्त्री, मिसेस सिंघ, सानू पारधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या