Hot Posts

6/recent/ticker-posts

सहयोगी प्राध्यापक श्री. उपदेश लाड़े यांना आचार्य पदवी प्रदान

 


देवरी,दि.17 ; 

     स्थानीक कुष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी द्वारा संचालीत छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फॉर्म व बीफार्म) देवरी जि. गोंदिया येथील सहयोगी प्राध्यापक श्री उपदेश भिमराव लाडे यांना सरदार पटेल विश्वविद्यालय, बालाघाट यांच्या मार्फत औषधी निर्माणशास्त्र क्षेत्रात Design and Development of Nanosponges for Topical Application करण्यात आली आहे.

 प्राध्यापक लाडे यांनी आपल्या पी.एचडी. दरम्यान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेऊन अनेक पेपर प्रकाशीत केले. यांसाठी त्यांना त्याचे गाईड म्हणून सरदार पटेल विश्वविद्यालय, बालाघाट येथील डॉ. राजेश मुजोरिया यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रथमत: त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आपले आई, वडील व पत्नी प्रा. सौ. श्रध्दा लाडे यांना दिले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.झामसिंगजी येरणे, सचिव श्री. अनिलकुमार येरणे तसेच प्राचार्य डॉ. अनिल चांदेवार त्याचप्रमाणे प्राचार्य डॉ. मिलींद उमेकर व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या