Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रेकरचा रस्ता ठरला,आहे घोगरा ते मुंडीकोटा नियमांची पायमल्ली ; ब्रेकर हटविण्याची मागणी

 


तिरोडा (मुंडीकोटा) ,दि.16 ; 

    सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारे घोगरा ते मुंडीकोटा रस्त्यांचे  डामरीकरण रस्ता काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला आहे. परंतु जर रस्ता बघितला तर  रस्त्यांला ब्रेकर पाहून  आपण सुद्धा चक्क व्हाल या रस्त्यावर घोगरा ते  मुंडीकोटा रस्त्यावर २ किलोमीटर अंतरावर १२ ते १४ ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. या ब्रेकर मुळे वाहन धारकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर नियम धाब्यावर ठेवून ब्रेकर  तयार करण्यात आले काय असा प्रश्न  नागरिक करीत आहेत. या रस्त्यावर दोन ते तीन लोकांचा अपघात होऊन दुखापत सुध्दा झाली आहे. ब्रेकर मुळे मणका तसेच वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ब्रेकर करिता कुणाची घेतली परवानगी

या रस्त्यावर १२ ते १५ ब्रेकर तयार करण्यात आले या साठी परवानगी घेण्यात आली की आपल्या मनमर्जी प्रमाणे ब्रेकर  तयार करण्यात आले आहेत. ब्रेकर मुळे वाहन धारकांना तसेच एखाद्या ईमरजेंसी पेंशेट न्यायचे झाले तर 14 ते 15 वेळा गाडीचे ब्रेक वाहन चालकांना लावावे लागत आहेत . त्यामुळे चक्क एवढे ब्रेकर 2 किलोमीटर अंतरावर देता येते काय कि नियम धाब्यावर बसवून तयार करण्यात आले आहे.  एक ब्रेकर आला कि गाडीचा ब्रेक दाबावे लागत आहे . यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काय आहे ब्रेकर चे नियम

 इंडीयन रोड काँगेस ( IRC) Code 99 1998 नुसार स्पीड ब्रेकर केवळ ४ इंच आणि दोन्ही बाजूला १२ फुट इतका रुंद असायला पाहिजे.ब्रेकर उभारल्या वर त्यावर थर्मी प्लास्टिक  पेन्ट पट्ट्या  पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे.याशिवाय वाहन धारकांना सुचना मिळण्यासाठी ब्रेकर येण्याआधी 40 मीटर अंतरावर सुचना फलकही रस्त्यावर असणे अपेक्षित आहे. ब्रेकर अडीच ते दहा सेंटीमीटर , लांबी  3.5 सेटिमीटर , वर्तुळाकार क्षेत्र 17 मीटर असायला हवे.

ब्रेकर मुळे आरोग्यावर  होत आहे परिणाम

वाहन धारकांना या मार्गावर 12 ते 15 ब्रेकर या्् तयार करण्यात आले असल्याने मणका  कमर तसेच पाठिंचा त्रास नागरिकांना होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.दोन तीन व्यक्ती ब्रेकर वरुन पडून कंबर तसेच हाता पायाला दुखापत झाली आहे. यामुळे ब्रेकरमुळे आरोग्यावर  परिणाम होत आहेत.

ब्रेकर मुळे अपघात होण्याची शक्यता

12 ते 15 ब्रेकर मुळे वाहन चालकांना एक ब्रेकर आला ब्रेक लावावे लागते एक झाला लगेच दुसरा यामुळे अपघात होण्याची शक्यता असून वाहन चालकांना मागे बसलेल्या व्यक्तीचा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यामुळे वाहन चालकांना आपले हात पाय सुध्दा गमावावे लागणार अशिच शक्यता वर्तविली जात आहे.

एवढेच ब्रेकर कशासाठी प्रश्न

एवढे बेकर कशासाठी अशा प्रश्न नागरिक करत आहेत यामुळे ब्रेकर हटविण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे .यावर आता प्रशासनाचे अधिकारी काय कारवाई करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या