Hot Posts

6/recent/ticker-posts

वाघाच्या हल्यात युवक ठार...

 


गोंदिया, दि.15 ; 

       गोरेगाव तालुक्यातील मुरदोली ते मुंडीपारदरम्यान पालेवाडा जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. १४) सायंकाळच्या सूमारास उघडकीस आली. बसंतराव खेतराम ढोरे (वय ४५ रा. कलपाथरी) असे त्यामृतक युवकाचे नाव आहे. बसंतराव हा शुक्रवार (दि. १३) रोजी शेळ्यांसाठी झाडांच्या फांद्या आणण्यास पालेवाडा जंगलपरिसरात गेला होता. मात्र, रात्रीपर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली असता त्याचा थांगपत्ता लागला नाही.

दरम्यान, शनिवारी (दि.14) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काही  गावकरी पालेवाड़ा जंगल परिसरात गेले असता त्यांना बसंतरावचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावर प्रथमदर्शनी पाहता ही घटना १३ सघ्टेंबर रोजीच घड़ली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती गोरेगाव वन परिक्षेत्र कार्यालयाला देण्यात आली. माहिती मिळताच विभागाच्या पथकाने घटनास्थळ  गाठून तपास कार्याला सुरूवात करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या