Hot Posts

6/recent/ticker-posts

देवरी-चिचगड मार्ग ; सालई येथील खचलेल्या पुलावरील पर्यायी मार्ग बंद केल्याने प्रवासी संतप्त

 


चार दिवस लोटूनही नागरिकांसाठी पर्यायी मार्ग नाही...   

 देवरी,दि. 21 ; 

     देवरी चिचगड मार्गावरील चार दिवसापूर्वी  खचलेल्या सालई येथील पुलावर अद्याप पर्यायी मार्ग तयार करन्यात आला. पकंतु तोही मार्ग  बंद केल्याने या मार्गाने ये - जा करनारे प्रवाशी  आज संतप्त झाले. व त्यांनी पुलाच्या ठिकाणीच आंदोलन केले.

 दि. 17 सप्टेंबर च्या पहाटे ला देवरी तालुक्यातील सालई जवळील ४० वर्ष जुना पूल खचल्याची घटना घडली होती. घटना घडतात प्रशासन खडबडून जागे झाले. जीर्ण झालेल्या फुलांचे अजून पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य देखरेख न केल्याचा ठपका बसला. जनप्रतिनिधींचा रोष पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलावरील पर्यायी मार्ग बनवण्याच्या कामाला लागले. ज्यात  तीन दिवसापासून पर्यायी मार्ग तयार होत असताना तो पर्यायी मार्ग कसा मसा तयार झाला . त्यावरून पर्यायी मार्गावरुन  (दि.20) शुकरवारला मोटर सायकलने नागरिक ये जा करीत असताना सायंकाळी पाचच्या दरम्यान ठेकेदाराने या पर्यायी मार्गावर रोलर आडवा करत रता बंद  केल्याने  मोटार सायकलने गावाकडे ये-जा करनार्या  लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी शंभर ते दीडशे मोटरसायकल पर्यायी मार्गाच्या ठिकाणी जमा झाल्या. लोकांच्या रहदारीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे चिचगड कडे जाणाऱ्या नागरिकांची चांगली तारांबळ उडाली असल्याने त्याच ठिकाणी नागरिकांनी आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.

उपस्थित नागरिकांनी स्थानीक जनप्रतिनीधी यानां  फोन केले  असता  बाहेर असल्याचे त्यांना सांगितले गेले. हा पर्यायी मार्ग तयार करीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बॅरीकेट न लावता पर्यायी मार्गाच्या मध्यस्थानी रोलर आडवा करण्यात आल्याने गावाकडे जायचे कसे? हा प्रश्न नागरिकांना पडला. ठेकेदाराच्या दुसऱ्या ठिकाणी सुरू असलेल्या कामावर अडथळा निर्माण झाल्याने ठेकेदाराने रोड रोलर आडवा केला असल्याचे दूरध्वनीवरुन स्थानीक जनप्रतिनीधी यांनी आंदोलनकर्ते  यांना सांगितले. 

सकाळी सुरू असलेला पर्यायी मार्ग सायंकाळी ठेकेदाराच्या आळमुठी धोरणामुळे व रोड रोलर आडवा केल्याने संतप्त नागरिकांनी शासन व प्रशासनाविरुद्ध चांगला रोष व्यक्त केला असून हा मार्ग नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी केव्हा सुरू होईल हा प्रश्न उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या