Hot Posts

6/recent/ticker-posts

उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने देवरी पोलिसांनी केले देवरी शहरातील इसमास तीन महिन्याकरीता हद्दपार...

 


देवरी,दि.23 ; 

       पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब गोंदिया, नित्यानंद झा अपर पोलीस अधीक्षक साहेब, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सा. देवरी, प्रविण डांगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी यांनी देवरी येथील गुंडास 3 महीन्याकरीता हद्दपार केले आहे. 

   विशेष म्हणजे, देवरी पोलिस्टेस हद्दीत  इसम नामे राजा ऊर्फ राजेश सुदर्शन भारती, वय ४२ वर्ष रा. मस्क-या चौक देवरी, ता. देवरी, जिल्हा गोंदिया हा पोलीस स्टेशन हृददीमध्ये परीसरातील तरुण गुंड प्रवृत्तीच्या मुलांना सोबत ठेवतो व त्यांचेशी मिळुन सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणे, जुगार खेळवणे , भांडण करुन मारण्यापिटण्याची धमकी देणे अशा प्रकारचे गुन्हेकरीत असल्याने त्याचेवर खेळ खेळविणे, चोरी करणे, घातक हत्याराचा धाक दाखकुन लोकांना धमकाविणे, अश्लील शिवीगाळ करने या करीता अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१),((अ),(ब) प्रमाणे त्याचे विरुध्द प्रस्ताव तयार करुन कारवाई करने कामी मा. उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांचेकडे सादर केले गेले होते.

 महाराष्ट्र पोलीस चौकशी व सुनावरणी करुन नमुद इसमाला देवरी,आमगाव,सालेकसा या तिन्ही तालुक्याच्या बाहेर 3 महिन्याकरीत हद्दपार करण्याकरीत पाठवीले असता प्रकरणाची मा. श्रीमती कविता गायकवाड उपविभागिय दंडाधिकारी देवरी यांनी सदर इसमाला देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यातुन 3 महिन्याकरीता हद्दपार केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या