Hot Posts

6/recent/ticker-posts

सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी येथे स्टुडन्ट कौन्सिल गठीत


 देवरी, दि.23 ; 

    स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी येथे दि. २१/०९/०२४ रोज शनिवारला स्टुडन्ट कौन्सिल गठीत करण्यात आले. यावेळी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. याप्रसंगी श्री. आशिषसिंग खतवार सर, प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी म्हणून, श्री. ए. डी. मशिद सर, प्रभारी विभागप्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी, श्री. आर. एस. नंदनवार, प्रभारी विभागप्रमुख, संगणक अभियांत्रिकी तसेच श्री. एम. एम. तरोणे सर, प्रभारी विभागप्रमुख, अणुविद्युत अभियांत्रिकी यांनी काम पाहिले. 

या मंत्रिमंडळामध्ये प्रेसिडेंट, वाईस-प्रेसिडेंट व सेक्रेटरी या तीन पदाकरिता लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये प्रेसिडेंट - देवेन व्ही. मोहबे, वाईस-प्रेसिडेंट - पवन आर. मडावी, सेक्रेटरी - कु. निलम एच. कोडापे यांची निवड करण्यात आली. तर ट्रेझरर, हॉल-रिप्रेझेंटेटिव्ह, पेटिशन रिप्रेझेंटेटिव्ह, टेक्निकल को-ऑर्डिनेटर, डिपार्टमेंटल एक्झिक्यूटिव्ह, स्पोर्ट्स एक्झिक्यूटिव्ह व क्लास एक्झिक्यूटिव्ह अशा एकूण 20 पदाकरिता विद्यार्थ्यांकडून आवेदन मागवून त्यांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात आली. 

नवनिर्वाचित स्टुडन्ट कौन्सिलचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थांनी अभिनंदन केले. एकंदरीत सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी येथील स्टुडन्ट कौन्सिलची निवड प्रक्रिया सर्व प्राध्यापकांच्या उपस्थितीत शांततेत व सुव्यवस्थीतपणे पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या