Hot Posts

6/recent/ticker-posts

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अविरत प्रयत्न ठेवणे गरजेचे - अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा

 


हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थीत ...


देवरी, दि. 29; 

         तालुक्यातील युवा मराठी पत्रकार संघ संयुक्त वनामी फाऊंडेशन  व हेल्पीग बाॅईज गृप यांच्या संयुक्त विद्यमानाने (दि.27) भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा , उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड,  उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक प्रविण डांगे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, पोलीस बाॅईज संघटना महाराष्ट्र  संस्थापक अध्यक्ष  राहुल दुबाले, वन परिक्षेत्रा धिकारी सचिन धात्रक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ ललित कुकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गगन गुप्ता, कार्यकारी अभियंता विद्युत विभाग प्रशांत उईके, कृषी अधिकारी लालन राजपूत, कायदेविषयक सल्लागार सचिन बावरीया, वनामी फाऊंडेशन संस्थापक गौतम साखरे हे उपस्थित होते. 


 उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . याप्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, होतकरू, विद्यार्थ्यांसह सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व त्यामाध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध परिक्षेची माहिती या प्रशंगी विद्यार्थांना मिळाली. ज्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत होईल. तालुक्यातील अनेक विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करतील. पत्रकारांनी विद्यार्थ्यांसाठी योग्य प्लॅटफॉर्म तयार केले असे उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड व उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांनी मार्गदर्शनात सांगितले. यावेळी अपर पोलिस अधिक्षक नित्यांनद झा,  उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड , प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, प्रविण डांगे, राहूल दुबाले, शुभम जाधव, निखिल बन्सोड यांची व्याख्याने झाली. अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

 देवरी तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या शिबीरात सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा यशस्वी आयोजन करण्यामध्ये मोहसिन अन्सारी, इलियास कुरेशी, संदेश मेश्राम, आशिष बावनकुळे, जय साखरे, सोबत युवा मराठी पत्रकार  संघटनेचे सदस्य, वनामी फाऊन्डेसन व हेल्पींग गृपच्या सदस्यानी सहकार्य केले. विविध जबाबदाऱ्या घेऊन उत्तमरीत्या पार पाडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवरी तालुका युवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकेश खरोले, तर सुत्रसंचालन निखिल बन्सोड यांनी केले. विलास चाकाटे यांनी  मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या