Hot Posts

6/recent/ticker-posts

आदिवासी विकास विभाग, राजपत्रीत अधिकारी संघटना कामबंद करणार..

 


देवरी,दि.25 ; 

       आदिवासी विकास विभागातील विवीध मागण्यांच्या अनुषंगाने कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी विकास विभागातील राजपत्रीत अधिकारी यांनी दिला आहे. आदिवासी विकास विभागातील राजपत्रीत अधिकारी यांचे मागण्यांबाबत गेल्या दोनवर्षापासुन शासनास वारंवार निवेदन देवुन, प्रत्यक्ष भेट घेदुन मागण्यांविषयी अवगत करण्यात आले आहे. यामध्ये इतर विभागातील अधिकारी यांना विभागात प्रतिनियुक्ती देण्यात येडु नये, देण्यात आलेल्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात, विभागातील रिक्त पदे कालबध्दपदोन्नतीने भरावी, अपर आयुक्त व उपआयुक्त पदाचे सेवाशतीचे नियम तात्काळ तयार करावे,जमाती पड़ताळणीच्या दृष्टीने कायदा नियमात सुधारणा करावी, मुदतपुर्व व नियमबाह्य बदल्या करण्यात येडू नये यासारख्या मागण्यांचे निवेदन शासनास सादर करण्यात आले आहे. 

मात्र सदरचे मागण्यांवर शासनाने कार्यवाही न करता विभागातील अधिकारी यांच्या मागण्यांवर दूर्लक्ष करुन नव्याने इतर विभागातील अधिकारी यांना विभागात प्रतिनियुक्ती देण्याचे प्रयत्न सुरु आहे.याबाबत विभागातील अधिकारी यांचेमध्ये असंतोषाची भावना असुन विभागाचे धोरण हे विभागातील अधिकारी यांचेवर अन्यायकारक असल्याचे विभागातील अधिकारी यांचे मत आहे. विभागात MPSC मार्फत निवड झालेले अधिकारी असतांना, विभागाचे सेवाप्रवेशाचे नियमनिश्चित असतांना, विभागात आदिवासी समुदायात प्रत्यक्ष काम केलेले अधिकारी असतांना त्यांना डावलुन, सेवाशर्तीचे नियम डावलुन इतर विभागातील अधिकारी यांची प्रतिनियुक्ती ही विभागातील अधिकारी यांचेवर अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने अशी नियुक्ती केल्यास विभागातील अधिकारी यांचे वतीने कामबंद आंदोलन करण्यात येईल तसेच विभागातील अधिकार्यांच्या मागण्यांबाबत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन मा. मंत्री, आदिवासी विकास विभाग व मा. सचिव आदिवासी विकास विभाग यांना देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या