Hot Posts

6/recent/ticker-posts

शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थाची विक्री, तिघांवर देवरी पोलिसांची कारवाई

 


देवरी, दि.24 ; 

    दिनांक २१/०९/२०२४ देवरी पोलीसांनी शाळा परिसरात तंबाखुजन्य, पदार्थाची विक्रीकरणा-या तिघांना धाड घालुन तंबाखु पुडया, सिगारेट, बिडी आदी पदार्थ जप्त केले होते. यामध्ये जिल्हा परिषद हायस्कुल देवरी शाळेच्या परिसरात इसम नामे ०१) राजेश्वर शिवलाल काळसर्पे, वय ४२ वर्ष, रा. वार्ड क्र ०८ देवरी ०२) हेमराज वासूदेव बोरकर, वय ४२ वर्ष रा.वार्ड क्र. १५ देवरी ०३) रंजन श्रिधर एनप्रिडीवार, रा. वार्ड क्र. ०८ देवरी. यांनी गुटखा पूड़ी,बिड़ी व तंबाख विक्री करीत असतांना त्यांना पोलीस हवालदार हिवराज परसमोड़े पोलीसस्टेशन देवरी यांनी पकडले.

      या तिन्ही आरोरपीवर पोलीस स्टेशन देवरी येथे सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने अर्धिनियम कलम ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या