Hot Posts

6/recent/ticker-posts

परतीचा पाऊस जिल्ह्यात धुमाकूळ घालण्याची शक्यता


गोंदिया,दि.23 ; 

      नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. दोन दिवसांत मोसमी वारे वायव्य भारतातून आपला परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. मॉन्सून परतीच्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने परतीचा पाऊस गोंदिया जिल्ह्यासह राज्यात धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जिल्ह्यात  पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. सप्टेंबर महिन्यातच राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसू लागला आहे. यातच पोषक हवामान झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन आठवडे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज असून, त्यानंतरही दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे.

 परतीचा पाऊस -हवी अधिक स्पष्टता...

पुढील दोन आठवड्यांत विदर्भातील  जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक तर  काही भागांत सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता असून, दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानंतरही आठवडाभर (३ ते १० ऑक्टोबर) राज्यात सर्वदूर पावसाचे संकेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या