Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक वनिकरण विभाग अंतर्गत वृक्ष लागवडीच्या कामावर हजेरी जास्त , मजूर कमी खड्डे न खोदणारे व्यक्ती कामावर



कामाची वरीष्ठ अधिका-यांनी शहानिशा करून चौकशी करण्याची मागणी...

 स./अर्जुनी, दि. 14 ; 

      सामाजिक वनिकरण विभाग कोहमारा/सडक अर्जुनी अंतर्गत धानोरी ते मालीजुंगा रोड व धानोरी ते लेंडेझरी रोडावरील दोन्ही बाजुला आॅगस्ट महिन्यात वृक्ष लागवड करण्यात आले.५ दिवसात २२००वृक्ष लावण्यात आले.मजुराकडून काही खड्डे खोदण्यात आले,तर उर्वरित खड्डे न खोदता वृक्ष लागवड करण्यात आली.वृक्ष लागवडीचे काम बोगस असून कामात अनियमितता दिसत असून डुंबरावर वृक्ष लागवड करण्यात आले आहे.तसेच कामावर बोगस हजेरी लावून हजेरी जास्त व मजूर कमी खड्डे न खोदणारे व्यक्ती कामावर दाखवून बोगस काम करण्यात आले. या कामाची वरिष्ठ अधिका-यांनी शहानिशा करून निष्पक्ष चौकशी करून दोषीं कर्मचा-यावर कारवाई करण्याची मागणी धानोरी येथील कामावर असलेल्या मजूरांनी केली आहे. ‌



सामाजिक वनिकरण विभाग कोहमारा/सडक अर्जुनी अंतर्गत धानोरी ते मालीजुंगा रोड व धानोरी ते लेंडेझरी रोडाचे दोन्ही बाजुला वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे कामाची सुरुवात २० जून २०२४ ला करण्यात आली. ३ आॅगस्ट २०२४ पर्यंत खड्डे खोदकाम धानोरी येथील मजूराचे सहाय्याने करण्यात आले.या रोडाचे दोन्ही बाजुचे १३०० खड्डे खोदण्यात आले असून उर्वरित ७०० खड्डे न खोदता वृक्ष लागवड करण्यात आले.व खड्डे खोदणा-या मजूरांना मध्येच कामावरून बंद करण्यात आले.या कामावर धानोरी येथील अमरसेन पटले,रामदास नारनवरे,कमलेश बिसेन,गुरुदास बिसेन,देवराम पेंदाम,पोमेश्वर मेश्राम,मंगेश मळकाम,रामदास मेश्राम,देवेश मेश्राम,शिवसागर राहांगडाले,गौरीशंकर कळंबे,हर्षवर्धन मरस्कोल्हे,तिमा मेश्राम,रामलाल भोंडे,जयलाल मरस्कोल्हे,भोजेंद्र मडावी,छगनलाल वरखडे,विजय वट्टी,कृष्णकुमार टेंभरे या मजूरांचे हातून खड्डे खोदून ,या मजूरांना मध्येच बंद करण्यात आले.५ आॅगस्ट २०२४ पासून वृक्ष लागवडीचे कामाला सुरू करून ९ ऑगस्ट २०२४ पर्यंत फक्त ५ दिवसात २२०० वृक्ष लावण्यात आले.मालीजुंगा रोडवर बिना खड्डे नखोदता ३५० वृक्ष लागवड करण्यात आले.तर लेंडेझरी रोड वर ३५० वृक्ष लागवड करण्यात आले.सदर काम वनरक्षक अभय बडोले व बारमाही वनमजूर सुनील भिमटे यांचे देखरेखीत व सांगण्यानुसार करण्यात आले.तेही लावलेले झाडे(वृक्ष) उपळून डबल लाईन मध्ये लावण्यात आले.उपळून लावलेले झाडे मेलेले आहेत.कामावरील मजूरांना मस्टर निघाले नाही म्हणून बिना हजेरीने काम करा,असे वनरक्षक व बारमाही वनमजूर यांनी मजूरांना सांगितले.तर मजूर कामावर असूनसुद्धा मस्टर वरून नांवे कमी केले आहेत.कामावरील मजूरांना वनरक्षक व बारमाही वनमजूर त्रास देत होते.या कामावर मुंडीपार येथील दोन मजूरांना कामावर घेतले होते.मुंडीपार येथील सुकचंद मेश्राम व आदिल मेश्राम हे मजूर बारमाही वनमजूराचे सासरे व साळे होते.ते फक्त हजेरी पुरता काम म्हणजे ३-४ तास थांबणे व घरी निघून जाणे असे काम होते.सर्व काम बोगस असून कामात अनियमितता आहे.बिना खड्ड्याने लावलेल्या झाडांना डुंबर बनविण्यात आले आहे.धानोरी येथील मजूरांना वनरक्षक व बारमाही वनमजूर यांनी ३० झाडांसाठी कुंपण एका मजूराकडून झाले तर ठिक नाहीतर कामावरून बंद व्हा.आम्ही दुसरे गावारून मजूर आणू ,अशी धमकी देत होते.तसेच बिना हजेरी व बिना मस्टरने वृक्षलागवड केल्यानंतर ८ दिवस कुंपण लावण्याचे काम केले.धानोरी येथील मजूरांना बंद करून‌ फक्त ५ मजूर कामावर ठेवले.या कामात वनरक्षक व बारमाही वनमजूर यांनी झाडे लावा,झाडे जगवा उपक्रमांतर्गत बोगस काम करून वृक्ष लागवड केली. या कामाची वरिष्ठ अधिका-यांनी शहानिशा व चौकशी करून दोंषींवर कारवाई करण्याची मागणी कामावरील मजूरांनी केली आहे. ‌

प्रतिक्रीया...

‌या कामावर ८ मजूरांनी खड्डे खोदण्याचे व वृक्ष लागवड करण्याचे काम केले.वनरक्षक व बारमाही वनमजूर यांनी काम ई-लिगल केले आहे.अर्धवट खड्डे खोदून झाडे लावली आहेत.तसेच डुंबरावर खड्डे न खोदता झाडे लावले .मजूरांना २९७ रूपये मजूरी आता मिळेल व नंतर १८७ रूपये मजूरी देण्यात येईल असे वनरक्षक यांनी सांगितले.बारमाही वनमजूर यांनी एक मजूर ४० झाडे लावून ४० डुंबर करायचे असे सांगितले.पण एक मजूर फक्त २० झाडे लावण्यात यशस्वी झाला.तर त्यांना बंद करण्यात आले.४० झाडे व ४०डुंबर एक मजूर करू शकणार नाही.कारण माती टणक होती. या कामावर आम्हा मजूरांना वनरक्षक व बारमाही वनमजूर त्रास देत होते. काम करायचे करा,नाहीतर कामावरून बंद व्हा.अशी धमकी देत होते.सदर काम बिना हजेरी व बिना मस्टरने करण्यात आले असून काम ई-लिगल आहे.या कामाची वरिष्ठ अधिकारी यांनी शहानिशा व चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. - अमरसेन पटले कामावरील मजूर. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या