Hot Posts

6/recent/ticker-posts

देवरी शहरासह तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी ; मध्य रात्री विजेच्या कडकडाट अन् वादळीवाऱ्यासह पाऊस

 


देवरी,दि.04; 

      गेल्या अनेक दिवसांपासून देवरी तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने (दि.03) मध्य रात्री पासुन देवरी शहरासह  तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार  हजेरी लावली आहे. त्यामुळे आलेला पाऊस खरीप बात पिकाला पुरक असल्याचे बोलले जात आहे. काही काळ थांबलेल्या पावसाने आज (दि.04)  दुपारी 3.00 वाजता पुन्हा सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे   शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले.

ग्रामीण भागातील ककोडी , चिचगड , लोहारा , शिरपुर , पालांदुर  आदी भागात आज  दुपारी तीन वाजेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील जमिनीत पाणी साचलेले दिसून आले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील  अनेक दुकानांचा तसेच रस्त्यांवर झाडांचा आडोसा घ्यावा लागला. तर नागरिकांकडे रेनकोट व छत्री नसल्याने त्यांनी लपण्यासाठी ठिकठिकाणी दुकानांच्या  गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे दिसून आले.

देवरी शहर  तालुक्यात मध्य रात्री  विजेच्या कडकडाट अन् वादळीवाऱ्यासह पाऊस...

    देवरी शहर तालुक्यात विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने वीज प्रवाह खंडित करण्यात आला होता. ग्रामीण भागात वादळी वारा व विजेचा कडकडाट असल्याने पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात होता. तर शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतांत पाणी साचलेले होते. तर रस्त्यावरही पाणी वाहताना दिसत होते. तर आज तालुक्यात दुपारी 3.00 वाजता नंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने याचा चांकलाच फायदा  तालुक्यातील भात पिकाला होनार असल्याने शेतकरी सुखावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या