Hot Posts

6/recent/ticker-posts

गणेश उत्सव व ईद -ए- मिलाद उत्सव शांततेत व निर्वीघ्नपणे पार पडावेत म्हणुन देवरी पोलीसांचे शहरात पथसंचलन

 


देवरी,दि.05 ; 

    मा. श्री. गोरख भामरे पोलीस अधिक्षक गोदिया यांच्या आदेशान्वये मा. श्री नित्यानंद झा  अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी व श्री विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात आगामी गणेश उत्सव व ईद -ए- मिलाद उत्सव शांततेत व निर्वीघ्नपणे पारपाडण्यासाठी तसेच सण उत्सव काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावीं यासाठी आज दिनांक ०५/०९/२०२४ रोजी सांयंकाळी १७/०० ते १८/३० वा. दरम्यान देवरी पोलीस विभागातर्फे शहरात पथंसचलन करन्यात आले. 



पथसंचलन देवरी शहरातील चिचगड रोड बाजार लईन , दुर्गाचौक , मस्जित , कारगील चौक , गणेशचोक पंचशिल चौक , मसक-या चौक , बौध्द विहार या मुख्य मार्गाने  रुट मार्च पथसंचलन करण्यात आले. 

सदर पथसंचलन दरम्यान मा. पो. नि, प्रविण डॉंगे ठाणेदार देवरी , सपोनि. गंगाकाचुर , मपोउपनि, मुळे मॅडम श्रेणी पोउपनि मानिक पुरी , पोलीस स्टेशन देवरी व १२६ पोलीस अंमलदार , व २७ गृहरक्षक हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या